अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जादा बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर विभागाच्या वतीने २४० जादा बस पंढरपूरच्या दिशेने धावणार आहेत. या सर्व बस तारकपूर विभागातून बसस्थानकातून सुटणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस भाविकांना लागते. त्यामुळे गावा-गावातून वारकऱ्यांच्या दिंड्या निघतात. तर बहुतांश भक्त एसटी बसने पंढरपूरला जाणे पसंत करतात. या भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडतात. नगर विभागाने जिल्ह्यातील २४० बसचे नियोजन केले आहे.
याशिवाय धुळे विभागाकडून आणि जळगाव विभागाकडून बस मागविले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून बस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नगर विभागाच्या वतीने एकूण २४० बसची व्यवस्था केली आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांनी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या एस.टी.चा प्रवास मोफत करण्यात आलेला आहे. याशिवाय महिला वर्गाला सरसकट पन्नास टक्के प्रवासात सवलत दिली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या वारीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नगर होऊन १३ जुलैपासून जादा बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार आहेत. मात्र, भाविकांची मागणी वाढल्यास जादा बसेस सोडल्या जातील, असे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे यांनी सांगितले.
...तर गावातूनच बसची व्यवस्था
एखाद्या गावातून ४० किंवा त्यापेक्षा जादा वारकऱ्यांनी पंढरीच्या वारी करण्यास इच्छुक असल्यास महामंडळाची बस थेट गावात येणार आहे. त्यामुळे संबंधित गावातील भाविकांनी लवकरात लवकर जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आगारनिहाय जादा बसची संख्या
तारकपूर ४०, शेवगाव-२०, जामखेड-१६, श्रीरामपूर २०, कोपरगाव-३०, पारनेर-१५, संगमनेर-२५, श्रीगोंदे-३०, नेवासे-१४, पाथर्डी-२०, अकोले- १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.