Bakri Eid : आषाढी एकादशीमुळे जामखेडला दुसऱ्या दिवशी साजरी होणार बकरी ईद; मुस्लीम समाजाचा निर्णय

bakari eid
bakari eid
Updated on

जामखेड : आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न देता ती दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय जामखेडमधील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. याबाबतची माहिती जमीयत उलमाए हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना खलील कासमी यांनी दिली आहे. याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

bakari eid
नालेसफाईची पोलखोल! 'या' परिस्थितीला पालिका-राज्य सरकार जबाबदार; वर्षा गायकवाड यांचा आरोप

आषाढी एकादशी आणि बकरी ईद सढाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या उपस्थितीत मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बेठक झाली. यावेळी मुस्लीम बांधवांनी वरील निर्णय घेतला.

यावेळी जमीयत उलमाए हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना खलील कासमी, उमर कुरेशी, हाजी कलीमुल्ला कुरेशी , विकीभाऊ सदाफुले , जमीर बारूद , माजी नगरसेवक अर्शद शेख, मोहम्मद कुरेशी , गुलाम कुरेशी , हनीफ कुरेशी, वाहेद पठाण , अबरार कुरेशी यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

bakari eid
Mohit Kamboj: उद्धव ठाकरे-भाजप व्हिडीओ वॉर! माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, म्हणत कंबोज यांचे थेट आव्हान

यावेळी पोलीस निरिक्षक पाटील यांनी मार्गदर्शनपर सुचना केल्या. त्यामध्ये उघड्यावर कुरबानी करू नये. बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये.

जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये अशा सुचना केल्या.

बकरी ईद हा सण मुस्लीम धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो.मात्र धार्मिक सहिष्णुता राखण्यासाठी आषाढी एकादशीदिवशी कुर्बानी न देता ,केवळ नमाज पठण केले जाणार आहे. दुस-या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

- मौलाना खलील कासमी, जमीयत उलमाए हिंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.