Sangamner : लाडक्या लेकराचा छंद पुरवा,एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उभे राहू द्या; थोरातांची विखेंवर बोचरी टिका

मोठ्याचं लेकरू लाडकं असल्याने त्याचा छंदच पुरवलाच पाहिजे. पक्षाने नाहीतर पालकाने पुरवला पाहिजे, शेवटी लेकराचा छंद आहे. दोन ठिकाणी ते म्हटले आहेत. वाटलं तर छंद पुरवण्याकरिता एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात.
balasaheb thorat criticize radhakrishna vikhe patil over assembly election 2024 sujay vikhe politics
balasaheb thorat criticize radhakrishna vikhe patil over assembly election 2024 sujay vikhe politicsSakal
Updated on

संगमनेर : मोठ्याचं लेकरू लाडकं असल्याने त्याचा छंदच पुरवलाच पाहिजे. पक्षाने नाहीतर पालकाने पुरवला पाहिजे, शेवटी लेकराचा छंद आहे. दोन ठिकाणी ते म्हटले आहेत. वाटलं तर छंद पुरवण्याकरिता एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. त्यामुळे त्यांचा छंद तरी पुरा होईल, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली आहे.

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचा शुक्रवारी (ता.२) उद्‍घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर पत्रकारांशी थोरात बोलत होते. थोरात म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्थ आहे.

एक प्रयत्न आहे की, पुरोगामी विचार मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. दुग्ध व्यवसायाला सरकार म्हणून कायमच मदत करावी लागत आहे. ज्या-ज्या वेळेस अडचण येईल, त्यावेळेस मदत करावी लागत आहे.

balasaheb thorat criticize radhakrishna vikhe patil over assembly election 2024 sujay vikhe politics
Ahmednagar : एलईडीने उजळले ‘मनपा’चे भाग्य; वीजबिलात ७२ टक्के बचत; शहरात ३२ हजार दिवे

आतापर्यंत आम्ही मदत केली आहे, फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्ही पाच रुपये अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरिता तीस रुपये हे त्या दूध संघांनी दिले पाहिजे, असे बंधन तुम्ही घातले.

तुम्ही वस्तुस्थितीशी निगडित नाहीत. तुम्ही फक्त मदत करायचा आव आणता आणि अटी अशा घालतात की, त्यातून काहीच होणार नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी खूप नाराज आहे. आताची मदत ही तुटपुंजी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.