Bastille Day: अभिमानास्पद! 'बॅस्टिल डे' संचलनात झळकणार नगरचा वीर; अमन जगताप करणार पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व

बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मुख्य अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित
Bastille Day 14 july Aman Jagtap will lead Punjab Regiment indian army ahmednagar
Bastille Day 14 july Aman Jagtap will lead Punjab Regiment indian army ahmednagar sakal
Updated on

अहमदनगर : फ्रान्स सरकार दरवर्षी १४ जुलै रोजी ‘बॅस्टिल डे संचलना’चे आयोजन करते. हा दिवस फ्रान्सच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जातो. यंदा ‘बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मुख्य अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत भारतीय लष्कराची एक तुकडीही संचलनासाठी जाणार आहे. या संचलनामध्ये ६० जवानांच्या तुकडीचे नेतृत्व अहमदनगरचे कॅप्टन अमन जगताप करतील. अमन हनुमान जगताप यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९९६ रोजी पुणे येथे झाला.

बारावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणसाठी त्यांनी अहमदनगर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लष्करात अधिकारी होण्याच्या इच्छेने त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये (एनसीसी) प्रवेश घेतला होता. २६ जानेवारी २०१५ रोजी राजपथावर ‘एनसीसी’चे नेतृत्व करण्याचा मान अमन यांना मिळाला होता.

Bastille Day 14 july Aman Jagtap will lead Punjab Regiment indian army ahmednagar
Ashadi Wari 2023 : नाम गजरात सोहळा वरवंडमध्ये दाखल

‘एनसीसी यूथ एक्सचेंज प्रोग्राम’अंतर्गत २०१६ मध्ये भूतान येथील १५ दिवसांच्या शिबिरासाठी त्यांची निवड झाली होती, त्यानंतर लवकरच भारतीय सैन्यदलामध्येही अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या प्रशिक्षणाला २०१९ मध्ये सुरवात झाली.

ट्रेनिंग पूर्ण करताच ७ मार्च २०२० रोजी लेफ्टनंट या पदावर त्यांची नेमणूक झाली. ‘२३- पंजाब रेजिमेंट’मध्ये अमन दाखल झाले. मेहनतीच्या बळावर ते कॅप्टनही बनले. पुन्हा एकदा राजपथावर तिरंग्याला सलामी देण्याचा मान त्यांना मिळाला.

Bastille Day 14 july Aman Jagtap will lead Punjab Regiment indian army ahmednagar
Mumbai Crime : कर्ज फेडण्यासाठी  त्याने निवडला चोरीचा मार्ग...हाती पडल्या बेड्या

२६ जानेवारी २०२३ रोजी कॅप्टन अमन जगताप यांनी राजपथावर पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. सर्वोकृष्ट पथकाचा मानही त्याच्या तुकडीला मिळाला होता. याच परिश्रमाच्या बळावर अमन आता फ्रान्सला निघाले आहेत. ते फ्रान्सच्या बॅस्टिल डे संचलनामध्ये ६० जवानांच्या पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व करणार आहेत.

बॅस्टिल डे परेडची पार्श्वभूमी

फ्रान्समध्ये आंदोलकांनी १४ जुलै १७८९ रोजी प्रसिद्ध बॅस्टिल किल्ला व तुरुंगावर हल्ला करत ताबा मिळविला होता. ही घटना फ्रेंच राज्य क्रांतीची सुरुवात मानली जाते. यामुळे १८८० पासून दरवर्षी १४ जुलै रोजी ‘बॅस्टिल डे परेड’चे आयोजन केले जाते. यानिमित्त पॅरिस शहरात लष्करी संचलन आणि आतषबाजी केली जाते. . हे फ्रान्समधील सर्वांत मोठे आणि जुने लष्करी संचलन आहे.

Bastille Day 14 july Aman Jagtap will lead Punjab Regiment indian army ahmednagar
Barack Obama : बराक ओबामा स्वत:जवळ हनुमानाची मूर्ती का ठेवतात ?

ओबामांच्या उपस्थितीत तिरंग्याला सलामी

२६ जानेवारी २०१५ रोजी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात ‘एनसीसी’च्या १४४ कॅडेटचे नेतृत्व अमन जगताप यांनी केले होते. या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अमन यांनी तिरंग्याला सलामी दिली होती. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ओबामा हे त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

जीवनात ठरविलेले ध्येय पूर्ण होत आहे. लहानपणापासून घेतलेल्या मेहनतीचे अन जिद्दीचे हे यश आहे. ‘एनसीसी’च्या माध्यमातून पुढील जीवनाला शिस्त आणि दिशा मिळाली. लष्करात दाखल झाल्यानंतर सातत्याने माझ्या तुकडीमधील सर्वांना प्रेरणा देत आहे. नुकत्याच राजपथावरील संचलनात आम्हाला उत्कृष्ट संचलनाचा पुरस्कार मिळाला. तीच माझी तुकडी आता फ्रान्समध्ये संचलनासाठी जाणार आहे. देशासाठी सर्वस्व पणाला लावतोय, याचा खूप अभिमान वाटतो.

- अमन जगताप, कॅप्टन, पंजाब रेजिमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.