अकोले (जि. नगर) : आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नती आरक्षण गेले. मंत्री वड्डेटीवार चिंतन बैठका तर मंत्री भुजबळ मोर्चे काढतात. डेटा देण्याचे काम राज्य सरकारचे असून स्थानिक स्वराज्य संस्था राज्य सरकारच्या अधिपत्याखाली चालतात. डिसेंबर पर्यंत सरकारने डाटा न दिल्यास मंत्र्यांना अडवून युवा वॉरियर्स माध्यमातून जाब विचारला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी अकोले येथे केले.
भारतीय जनता पार्टीचे तालुक्यात विविध ठिकाणी शाखा उद्घाटन झाले. येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजीमंत्री मधुकर पिचड उपस्थित होते. भाजपचे युवा वॉरियर्स राज्य अध्यक्ष विक्रांत पाटील, योगीराज परदेशी, धीरज डेरे, नितीन देवधर, सुनील वाणी, राहुल देशमुख, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी, संतोष बनसोडे, श्रीराम पन्हाळे, गोकुळ कानकाटे, जे. डी. आंबरे उपस्थित होते. वैभव पिचड यांनी तालुक्यात युवकांचे जाळे विणले जाईल, असे आश्वासन दिले.
न्याय कोणाकडे मागायचा
चंद्रकांत बावनकुळे म्हणाले मंत्री नितीन राउत यांनी गरीबांचे वार्षिक सात हजार कोटी रुपयांचे वीज बिल माफ करू असे जाहिर केले. मी विरोधीपक्षाचा असूनही त्यांच्या या धोरणाचे स्वागत करतो. मात्र, आठ महिने उलटूनही वीज बिल माफी होत नाही, म्हणून त्यांना भेटलो असता त्यांनी अजित पवार सही करत नसल्याचे सांगितले. मग आम्ही पवार यांना भेटलो असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सांगितले. हे काम सरकारचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आहे.
Bavankule said reservation of maratha obc community was lost due to state government
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.