श्रीरामपूर ः शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, प्रशासनाने शहरातील अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बंद केले आहेत. मात्र, इतरत्र लोकांचा खुलेआम वावर सुरू आहे. मर्चंट असोसिएशनने आजपासून चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याची घोषणा केली. मात्र, हा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन न घेतल्याने काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत बाजारपेठ बंद न ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरातील काही भाग बंद, तर काही सुरू, असे चित्र दिसत होते.
हेही वाचा शिवसेनेतील तेव्हाचे खलनायक आज ठरले नायक
शहरातील प्रभाग दोन, पूर्णवादनगर, चोथानी हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तेथील सर्व रस्ते बंद केले. नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी पालिकेमार्फत सुविधा देण्याचे उपाय योजले आहेत. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी शहरात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन केले. व्यापारी असोसिएशनने आजपासून चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, हा निर्णय घेताना सर्वांना विश्वासात न घेतल्याने बाजारपेठ बंद ठेवू नये, असे आवाहन काही व्यापाऱ्यांनी केले.
आवश्य वाचा ग्रामंपचायतीवर योग्य प्रशासक नेमा अन्यथा....
लॉकडाउनमुळे चार महिन्यांपासून व्यापार बंद असल्याने छोटे-मोठे व्यापारी, दुकानदारांची अवस्था बिकट झाली आहे. मोठे व्यापारी होलसेलमध्ये आपल्या मालाची विक्री करून पैसे कमवितात. परंतु छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना बंद पाळण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे या "बंद'ला विरोध करीत व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन अशोक उपाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. व्यापाऱ्यांमधील मतभेदांमुळे शहराची बाजारपेठ सुरू की बंद राहणार, हे उद्या कळेल.
हेही वाचा परवानगी मिळूनही या जिल्ह्यात हॉटेल बंदच
बेलापूर येथे सर्व व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी तीन दिवस कडकडीत बंद पाळला. त्याच पद्धतीने शहरातही निर्णय होण्याची गरज आहे. शहराचा जो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे, त्या व्यतिरिक्त इतर भागातही स्वयंस्फूर्तीने काही बंधने पाळल्यास शहरातून कोरोनाचा नायनाट होण्यास वेळ लागणार नाही. शासकीय यंत्रणेने शहरातील नागरिकांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. अहमदनगर,
संपादन - सूर्यकांत वरकड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.