Bhima River Flood : मुसळधार पावसामुळे भीमेला पूर; पुलावरील वाहतूक पोलिस बंदोबस्तासह बंद

Ahmednagar Rain News In Marathi |दीड लाख क्यूसेक विसर्ग; कृषिपंप, पिके अन् शिवार पाण्याखाली
bhima river floods due to heavy rains traffic bridge closed with police security monsoon
bhima river floods due to heavy rainsSakal
Updated on

सिद्धटेक : भीमा पाणलोटक्षेत्रात, पुणे शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांना पूर आला. त्या नद्यांवरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यातील पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीलाही पूर आला. त्यामुळे काठावरील पिके, ओढे, कृषिपंप पाण्यात बुडाले आहेत. दरम्यान, पाण्याने येथील पुलाला स्पर्श केला असल्याने व पाणीपातळी स्थिर नसल्यामुळे पुलावरील वाहतूक पोलिस बंदोबस्तासह बंद करण्यात आली आहे.

गुरुवारी (ता.२५) मध्यरात्रीनंतर सर्वत्र सुरू झालेल्या संततधारेमुळे खडकवासल्यासह कासारसाई, कळमोडी, वडीवळे, तसेच इतर प्रकल्पांमधून मिळून दीड लाख क्यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. परिणामी, भीमा नदीला पूर आल्याने भीमाकाठचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

नदीकाठावरील ऊस, कापूस, तसेच चारा पिके पाण्याखाली गेली आहेत. काल रात्रीनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे परिसर जलमय झाला आहे.

पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या माध्यमातून येथे पुलावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तसेच मंडळाधिकारी रवींद्र बेल्हेकर, तलाठी कालिचरण मखरे, ग्रामविकास अधिकारी श्याम भोसले, कृषी सहायक राजेंद्र खामगळ, सागर मोरे, पोलिस पाटील दादासाहेब भोसले व इतर कर्मचारी उशिरापर्यंत कार्यरत होते.

पूरस्थिती नियंत्रणात

सुमारे दहा ते बारा तासांतच भीमा नदीपात्रात दीड लाख क्यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून येथील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

bhima river floods due to heavy rains traffic bridge closed with police security monsoon
Ahmednagar Mula Dam : मुळा धरण ५० टक्के २९ हजार ५३३ क्यूसेकने आवक

पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या तयार करण्यात आल्या असून व सायंकाळनंतर विसर्ग कमी झाल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी स्पष्ट केले.

अखेर उजनी प्लसमध्ये...

मागील पावसाळ्यात केवळ ६० टक्केच भरलेले उजनी धरण उन्हाळ्यात मायनस ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी ते पुन्हा एकदा ''प्लस''मध्ये आले. आता ते शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.