सरकारने मंदिरे उघडावी; भाजपचे संगमनेरमध्ये आंदोलन

BJP agitation in sanmganer for opening temples in maharashtra
BJP agitation in sanmganer for opening temples in maharashtra esakal
Updated on

संगमनेर (जि. अहमदनगर) : दोन वर्षांपासून कोविड महामारीच्या (Coronavirus) प्रादुर्भावाच्या भीतीमुळे राज्य शासनातर्फे राज्यातील सर्व धार्मिक देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. या काळात मंदिरावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभुमिवर राज्यातील मंदिरे उघडावीत या मागणीसाठी आज भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील दत्त मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले.

धार्मिक स्थळांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची

सुमारे दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. याकाळात कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांतर्गत गर्दी टाळण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्य़ाचे आदेश देण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले फुल, हार, नारळ, प्रसाद, तेल, श्रीफळ, पूजा साहित्य आदींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या मुळे हिंदु धर्माच्या धार्मिक बाबींवर गदा आली असुन, दर्शनासाठी भाविकांना परवानगी नसल्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला आहे. सध्या कोविड प्रादुर्भावाचे प्रमाण घटल्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्याची मागणी तहसीलदार अमोल निकम यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

BJP agitation in sanmganer for opening temples in maharashtra
पावसाअभावी दुबार कांदा रोपेही लागवडीविना सुकली!

या वेळी भाजपचे आध्यत्मिक आघाडी प्रमुख गुंजाळ महाराज, आध्यात्मिक विभाग शहर प्रमुख किरपाल डंग, ज्येष्ठ नेते राम जाजू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष अशोक इथापे, किसान मोर्चा अध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, नगरसेविका मेघा भगत, तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, भरत फटांगरे, शैलेश फटांगरे, दीपेश ताटकर, काशिनाथ पावसे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, जिल्हा वरिष्ठ नागरिक सेल प्रमुख शिवाजीराव लष्करे, हरीश चकोर, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष रेश्मा खांडरे, अरुणा पवार, ज्योती भोर, महिला शहराध्यक्ष प्राजक्ता बागुल, कांचन ढोरे, उपाध्यक्ष श्रीकांत कासट, दिलीप रावल, शिवकुमार भांगिरे, विकास गुळवे, बालाजी लालपोतु आदी उपस्थित होते

BJP agitation in sanmganer for opening temples in maharashtra
अमित ठाकरे - आमदार ढिकले भेट व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.