कर्जत (जि. अहमनगर) : मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) पोलीस बंदोबस्त कशासाठी? असा सवाल भाजप नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की नव्या पर्वाची आगळी वेगळी सुरुवात झाली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहीत्रांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, वीज बिल भरायचे की दिवाळी साजरी करायची ?असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी व जनतेला पडला आहे. खंडीत वीज पुरवठयामुळे तर लोक प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात फिरत नाहीत ना? असा सवाल श्री सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे.,
दादासाहेब सोनमाळींचे रोहीत पवारांवर टीकास्त्र
गेल्या दोन वर्षांत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.! असा गवगवा ते सोशल मीडियात करत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुक्यातील शेती पंप व घरगुती कनेक्शन असलेल्या अनेक रोहीत्रांचा वीज पुरवठा महावीतरणने तोडला आहे. वीज बिल भरणा केला तरच वीज कनेक्शन जोडता येईल असे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत. यामुळे विहिरीत पाणी असून ते पिकांना देता येत नाही, यामुळे पिके जळू लागली आहेत. दिवाळी करायची की बिल भरायची अशा दुहेरी समस्येमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गेली दोन वर्षे विकास कामाची पद्धत पाहीली असता आमदार रोहित पवार यांनी आता पर्यन्त एकही मोठे काम केले नाही. भिंती, सोशल मीडिया व कागदावरच सध्या विकास चालू आहे. पुर्वी मंजूर झालेली कामे सध्या सुरू आहेत. ती कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल श्री सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत सध्या तरी लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कॅबिनेट मंत्र्यांच्या स्वागताला अधिकारी नाही पण...
त्यांनी पुढे नमूद केले आहे की येत्या सहा महिन्यांत माजी मंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील असे आपण म्हणाला होतात, तुम्हीच पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात? आपल्या कार्यपद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कर्जत तालुक्यातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे शासकीय नोकर आहेत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख तालुक्याच्या दौऱ्यावर येतात तेंव्हा हे अधिकारी उपस्थित नसतात मात्र आमदार किंवा त्यांचे नातेवाईक आले तर हे सर्व जण हजर असतात ही वस्तुस्थिती आहे.
माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले. नुकसान भरपाई साठी मोठ्य प्रमाणावर निधी उपलब्ध झाला मात्र यामध्ये अनेक ठिकाणी काळंबेरं झाले आहे. याबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत.तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.