Nitesh Rane : हिंदू समाजाविरोधातील षडयंत्र मोडीत काढणार - नितेश राणे

नितेश राणे श्रीगोंदे शहरात सकल हिंदू समाजाचा ‘तहसील’वर मोर्चा
Nitesh Rane
Nitesh Ranesakal
Updated on

श्रीगोंदे : आम्ही सर्वधर्मसमभाव जपणारी मंडळी आहोत, पण गेल्या काही दिवसांत श्रीगोंद्यासह विविध भागांत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे प्रकार समोर येत आहेत. हिंदू समाजाविरोधात सुरू असणारे हे षडयंत्र आहे.

ते कसे मोडीत काढायचे ते आम्हाला पक्के माहिती आहे आणि त्यादृष्टीने आमची तयारी सुरू झाली आहे. हिंदू समाजाच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये, बंदोबस्त करू, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला. श्रीगोंद्यात सुरू असणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारी शिक्षा मिळणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Nitesh Rane
Nitesh Rane : 'मनमोहन सिंगांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळंच 140 कोटी जनतेनं मोदींच्या हातात सत्ता दिली'

श्रीगोंद्यात तहसील कार्यालयावर आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राणे यांच्यासह आमदार महेश लांडगे व बबनराव पाचपुते, संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे, माजी खासदार अमर साबळे, शरद मोहोळ, शिवशंकर स्वामी, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.

Nitesh Rane
Ahmednagar News : पैसे नाहीत तर अंदाजपत्रकात नगरसेवक निधीची तरतूद कशाला; बारस्कर

राणे म्हणाले, की ज्या पद्धतीने हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्ती करीत आहेत, ते सगळ्यांसाठी घातक आहे. या भागातही धर्मांतराचा प्रयत्न झाला आहे. श्रीगोंद्यातील कत्तलखाने तक्रारी करूनही बंद होत नाहीत. सरकार त्यासाठी समर्थ आहे. धर्मांतरविरोधी कायदा करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सूचित केले आहे.

अजितदादांचे स्वागतच आहे ः राणे

अजित पवार हे आपल्यासोबत आले आहेत, त्याविषयी काय मत आहे, असे पत्रकारांनी विचारल्यावर राणे म्हणाले, की हे सरकार हिंदूंसाठी काम करणारे आहे. जे येतील, त्यांनाही हिंदू धर्मासाठी योगदान अगोदर द्यावे लागेल. अजित पवार आले आहेत, त्यांचे स्वागतच आहे. सरकारची ताकद वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.