Amit Gorkhe : अमित गोरखे विधिमंडळातील श्रीगोंद्याचे सातवे भूमिपुत्र?

राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप या तिघा भूमिपुत्रांनी श्रीगोंदे मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.
Amit Gorkhe
Amit Gorkhesakal
Updated on

- समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे - श्रीगोंद्याच्या सहा भूमिपुत्रांनी राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले आहे. नुकतीच भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिलेले पूर्वाश्रमीचे लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील रहिवासी अमित गोरखे विजयी झाल्यास ते विधिमंडळात जाणारे श्रीगोंद्याचे सातवे भूमिपुत्र ठरतील.

राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप या तिघा भूमिपुत्रांनी श्रीगोंदे मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. स्व. शिवाजीराव नागवडे यांनी १९७८ व १९९९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता, तर पाचपुते यांनी १९८० पासून आजपर्यंत १९९९ व २०१४ चा अपवाद वगळता या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, तर २०१४ ते २०१९ या काळात माजी आमदार राहुल जगताप हे विधानसभा सदस्य होते.

मूळचे बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) गावचे भूमिपुत्र असलेले माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले आहे, तर त्यांचे सुपुत्र संग्राम जगताप हे नगर शहर मतदारसंघाचे दुसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत.

घोगरगाव (ता. श्रीगोंदे) येथील रहिवासी असलेले ॲड. निवृत्ती विठ्ठल उगले हे साठच्या दशकात आष्टी (जि. बीड) येथे वकिली करीत होते. त्यांनी १९६७ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून आष्टी (जि. बीड) मतदारसंघात उमेदवारी करीत विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी १९६७ ते १९७२ या काळात विधानसभेत, तर १९७२ ते १९७८ या काळात विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. त्यांनी विधिमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात काम केले.

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात श्रीगोंद्याचे भूमिपुत्र व सध्या पिंपरी (जि. पुणे) कार्यरत असणारे अमित गणपत गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. गोरखे यांचे वडील गणपत गोरखे हे १९७२ च्या दुष्काळात लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथून रोजगाराच्या शोधात पिंपरी येथे स्थलांतरीत झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करीत अमित गोरखे यांनी शिक्षण संस्था उभारली. ते गेली अनेक वर्षे भाजपचे काम करीत आहेत. संघटनेतील कामाच्या जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन केली.

गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात निष्ठेने व निरपेक्षपणे काम करीत आहे. त्याची दखल घेत पक्षाने मला भरभरून दिले आहे. विधानपरिषदेवर दिलेली संधी ही दीनदलित समाजाला दिलेला बहुमान आहे.

- अमित गोरखे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.