गरिबांचा शिधा काळ्या बाजारात; संशयाची सुई आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे

Grain
Grainesakal
Updated on

अकोले (जि. अहमदनगर) : तालुक्यातील स्वस्त धान्य रात्री दोन वाजता ट्रकमधून (एमएच १७ बीवाय ३५१८) काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जात असताना, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून, त्यातून गहू, तांदूळ, डाळ आदी धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविले.

तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा

तहसीलदार सुरेश थेटे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, मंडलअधिकारी बाबासाहेब दातखिळे, सुनील मुळे, गोडाऊन कीपर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक व त्यातील धान्याचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. माजी आमदार वैभव पिचड यांनी, या धान्याची कसून चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आज भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, प्रांत, पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले. वर्षातील ही तिसरी घटना असून, प्रशासनाने याबाबत अधिक माहिती घेऊन, या रॅकेटमध्ये कुणाचे हितसंबंध अडकले आहेत, त्याची पोलखोल करावी.

Grain
दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेले पुढारीच नशेत तर्रर्र...

आमदाराचे पोस्टर लावणारे पदाधिकारी या साखळीत - पिचड

दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेचे धान्य काळ्या बाजारात जात असेल, तर लोकप्रतिनिधी करतात काय, असा सवाल उपस्थित करून, तहसीलदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन दिवसात संबंधितांना अटक करावी व गैरप्रकार थांबवावा, असे आवाहन पिचड यांनी केले आहे.

माझ्या कार्यकर्त्यांनी रात्र जागवून गरिबांचे अन्न काळ्या बाजारात जाताना अडविले. त्यांच्या या कामगिरीला मी शाबासकी देतो. मात्र, आमदाराचे पोस्टर लावणारे पदाधिकारी या साखळीत आहेत. त्यांच्याबाबत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज गवादे, राहुल देशमुख, शंभू नेहे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

''रात्रीच्या वेळी ट्रकमधून चालविलेले धान्य ताब्यात घेतले. योग्य पद्धतीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करू.'' - सतीश थेटे, तहसीलदार

माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना निवेदन देत, धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, राहुल देशमुख, शंभूराजे नेहे.

Grain
राज्यातील आदिवासी शाळांत ‘दिल्ली पॅटर्न’; प्राजक्त तनपुरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.