संगमनेर (अहमदनगर) : शहर पोलिसांनी ३० लाखांच्या खाद्यतेल अपहार प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून साडेआठ लाखांच्या तेलासह दीड लाखांची रोकड, असा १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. (both have been arrested in connection with the embezzlement of edible oil in sangamner)
अफजलखान साहेबखान पठाण (रा. मोमीनपुरा, संगमनेर) यांच्या मालट्रकमधून (एमएच १७ एजी ७७८९) चालक अरुण उदमले (रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) याने अजय कांबळेच्या सांगण्यावरून अदानी कंपनीतून १५ लिटरचे एक हजार ९० डबे व एक लिटर पॅकिंग असलेले व एका डब्यात दहा लिटर तेल असलेले दोनशे डबे, असा माल भरला होता. हा माल पुण्यातील बसंत ट्रेडिंग कंपनी येथे पोचणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीचा तथाकथित कर्मचारी अजय कांबळे याच्या सांगण्यावरून तो माल राजगुरुनगर (खेड) येथे दुसऱ्या वाहनात भरण्यात आला. भाड्याचे पैसे न मिळाल्याने, ट्रकचालकाने पुणे येथे फोन केला असता, संबंधित माल पुणे येथे पोचलाच नसल्याचे समजले.
याप्रकरणी अरुण उदमले व अफजलखान पठाण यांना आरोपी करून तपास सुरू केला. दरम्यान, हा माल काष्टी (ता. श्रीगोंदे) येथे खाली झाल्याचे निष्पन्न झाले. तपासात हा प्रकार नगरमधील नरेंदर राजेंद्रसिंग रोतेला (रा. पाइपलाइन रस्ता) व अनिल भारत मिरपगार (रा. तारकपूर) या दोघांनी केल्याचे व ते पसार झाल्याचे समोर आले. त्यांना गोव्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नगरमध्ये छापा घालत आठ लाख ३३ हजार ५८० रुपयांचे प्रत्येकी १५ लिटर खाद्यतेल असलेले ३३० डबे व दीड लाखांची रोकड, असा ९ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.(both have been arrested in connection with the embezzlement of edible oil in sangamner)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.