संगमनेर (जि.अहमदनगर) : देशभरात स्वातंत्र्यदिन (independence day) उत्साहात साजरा होत असताना, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर शिवारात, सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यतींचे (Bullock cart race) आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसात कोवीडचा हॉटस्पॉट (covid hotspot) ठरलेल्या पठार भागात या निमित्ताने मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणी पोलीसांनी कारवाई (police action) करुन दोन आयोजकांसह तब्बल ४६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शर्यतीच्या थराराचे व्हीडिओ प्रसारमाध्यमात व्हायरल
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार ( ता.15 ) रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या दरम्यान तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारातील देवीच्या मंदिरासमोरच्या पटांगणात बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. स्पर्धकांकडून प्रत्येकी 2 हजार रुपये टोकन घेवून, ही हारजितीची शर्यत लक्ष्मण गजाबा गीते, रा. कौठे मलकापूर यांनी आयोजित केली होती. यासाठी मैदानात निर्धारित लांबीच्या चार धावपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. सुमारे तीन तास जल्लोषात सुरु असलेल्या या शर्यतीच्या थराराचे व्हीडिओ प्रसारमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांसह सर्वांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन घटनास्थळाहून सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच 4 लाख किमतीचे वाहन, 2 लाख रुपयांची बैलजोडी, 10 हजार रुपयांचा शर्यतीचा छकडा, खिळा असलेली बांबुची काठी आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आयोजकासह 46 जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस काँस्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन पावडे ( 38 ), राहुल काळे दोघेही रा. पाचघर, नितीन धोंडकर ( 22 ), अक्षय डुबरे ( 26 ), चैतन्य पडवळ, सचीन पानसरे ( 26 ), चौघेही रा. ओतूर, श्रीकांत मंडलीक ( 27 ) रा. डिंगोर, शिवाजी कारंडे ( 53 ), रा. दरेवाडी, आयोजक लक्ष्मण गिते व राहुल गंभीरे दोघेही रा. कौठे मलकापूर, राकेश खैरे ( पुर्ण नाव गाव माहीत नाही ) सुरेश चितळकर व संजय देवकाते दोघेही रा. चितळकर वस्ती, साकुर, बाळासाहेब महाकाळ, रा. मांदारणे, सतीश खेमनर, रा. बिरेवाडी, भाऊसाहेब खेमनर व दादासाहेब खेमनर, दोघेही रा. हिरेवाडी, विशाल खेमनर, शुभम नान्नर व अमोल नान्नर, तिघेही रा. नान्नरवस्ती, बाळु कुदनर, रा. शिंदोडी, प्रतिक ठोंबरे रा. जांबुत या 21 जणांसह 20 ते 25 अज्ञात जणांवर कलम 188, 269 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119, सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.