संगमनेर : बसचालकाची आत्महत्या; एसटी विभागाला झटका

bus driver
bus driveresakal
Updated on

संगमनेर (जि.अहमदनगर) : आज पहाटेच्या सुमारास एसटी विभागाला (ST department) झटका बसला आहे. कारण मंगळवारी ( ता. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकावर एका एसटी बसमध्ये (ST bus) गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. आणि एकच खळबळ माजली. बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीतून बसचालकाने (bus driver suicide) धक्कादायक खुलासा केला आहे.

बसमध्ये चालकाची आत्महत्या; चिठ्ठीतून केला धक्कादायक खुलासा

आज ( ता.२१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नाशिक या बसमध्ये बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष तेलोरे ( रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. कर्जाला कंटाळून बसचालकाने आत्महत्या केल्याचे समजते. आज पहाटे पाच वाजता त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांसह प्रात: विधी व इतर आटोपून फ्रेश झाले होते. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगितले की मी पुढे जातो तुम्ही पाठीमागून या. त्यानंतर पंधरा मिनिटांनी एसटी बस वाहक येथे आला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये त्यांना सुमारे साडेसहा लाख रुपये कर्ज असल्याने, कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

bus driver
नगर- पुणे महामार्गावर विचित्र अपघात; चार जण जागीच ठार
bus driver
ठेकेदार संस्कृतीच संगमनेरची ओळख - राधाकृष्ण विखे पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()