राहाता, (जि. अहिल्यानगर) - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले आहे. शिवसेनेबरोबरची आमची विचारधारा भिन्न असली तरी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते. आता मी तुम्हाला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनाही आव्हान देते की, तुम्ही दोघेही व्यासपीठावर एकत्र या आणि जातनिहाय जनगणना तसेच आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटविण्याचे जाहीर कराल का?’असा सवाल काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांनी आज येथे केला.