Career Options : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून कॉम्प्युटर सायन्सशी निगडित काही अभ्यासक्रमांबद्दल तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या सुरवातीलाच मिळणे शक्य आहे.
या अभ्यासक्रमात एथिकल हॅकिंग आणि मॅनेजमेंट व नेटवर्क सिक्युरिटी आदी विषयांवर भर देण्यात आला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सायबर सुरक्षातज्ज्ञ, प्रवेश परीक्षक, अधिकारी म्हणून किमान ८ ते १० लाखांचे पॅकेज सहज मिळते. याशिवाय सिक्युरिटी कंपन्या, फायनान्स किंवा सरकारी क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध आहे.
बीई हार्डवेअर, सॉफ्टवेअर सिस्टमचा अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क इंजिनिअर अशा पदांवर नोकरीची संधी आहे. अगदी सुरवातीलाच ४ ते ८ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. यामध्ये आयटी,कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये संधी आहेत.
या कोर्सच्या माध्यमातून पदवीधरांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा अॅनालिस्ट म्हणून नोकरीची संधी मिळते. वेब डेव्हलपर्स म्हणून काम करणारे वर्षाला ५ ते ६ लाखांहून अधिक कमावतात; तसेच हा कोर्स केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी असते.
आयटीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकास, संगणक प्रणाली आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. या कोर्सनंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून पदवीधरांना ८ ते ९ लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायनान्स आणि शासकीय क्षेत्रातही करिअरची संधी आहे.
या अभ्यासक्रमात कॉप्युटर ॲप्लिकेशन आणि प्रोग्रामिंग भाषा यांचा समावेश आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनसारख्या पदांवर नोकरीची संधी असते. पदवीधारकांना सुमारे वार्षिक पाच लाखांपर्यंत पॅकेज मिळते. याशिवाय कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी कंपन्या, सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्येदेखील संधी असते.
यामध्ये अभियांत्रिकी, कोडिंग, प्रकल्प व्यवस्थापन यावर अभ्यासक्रम असतो. सॉफ्टवेअर इंजिनिअर; तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधरांना वार्षिक चार ते सात लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकते.
सध्या बारावीनंतर अनेक विद्यार्थी बी.एस्सी. इन डेटा सायन्स या अभ्यासक्रमाला पसंती देत आहेत. या अभ्यासक्रमात डेटा विश्लेषण, एमएल व सांख्यिकीय मॉडेलिंगवर भर देण्यात आला आहे. सायन्टिस्ट, डेटा अनालिस्ट, बीआय ॲनालिस्ट म्हणून पदवीधारकांना आठ ते दहा लाखांचे वार्षिक पॅकेज मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनालिटिक्स आणि एआय अशा उद्योग क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात संधी आहेत.
सी-सी, प्लस-प्लस, जावा यासह इतर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या तरुणांना चांगले पॅकेज देतात.
आयटीमध्ये बिझनेस मॅनेजमेंट कोर्स (बीबीए) चालविला जातो. हा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी तंत्रज्ञानासह शासकीय क्षेत्रातही उत्तम करिअर करतात.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग कोर्सचा अभ्यासक्रम हा आजच्या काळातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी असते.
बारावीनंतर युवकांचा कल हा डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्सकडे वाढला आहे. आजच्या युगात हा कोर्स करणाऱ्या तरुणांना खूप डीमांड आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी आणि सॉफ्टवेअर डेटा अनालिस्ट, खासगी कंपन्या, ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये संधी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.