Ahmednagar News : बाजारपेठेवर सीसीटीव्हीचा वॉच; पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यास मदत

बी. जी. शेखर यांच्या आवाहनाला जिल्ह्यात मिळतेय साथ; शेवगावमध्ये केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचा पुढाकार
cctv in front of medical and main road to help to police investigation reduce crime shevgaon ahmednagar
cctv in front of medical and main road to help to police investigation reduce crime shevgaon ahmednagarSakal
Updated on

शेवगाव : शेवगाव शहर व तालुक्यातील २५० मेडिकल स्टोअर्ससमोर व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यास मदत होणार आहे. केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत होणार आहे.

शहराता विस्तार वाढल्यामुळे शहरातील व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर एक मोठे आवाहन ठरत आहे. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ हा उपक्रम राबविण्याची सूचना विविध व्यावसायिकांना केली होती. त्याअनुषंगाने शेवगाव तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शेवगाव पोलिस ठाण्यात झाली.

cctv in front of medical and main road to help to police investigation reduce crime shevgaon ahmednagar
Ahmednagar Traffic : शहरातील उड्डाणपूल सुरू, तरी थांबेना शहरातील वाहतूक कोंडी

त्यामध्ये शहर व तालुक्यातील २५० मेडिकल स्टोअरचालकांनी आपल्या दुकानांसमोर व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांमध्ये यावर अंमलबजावणी करून हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

शेवगाव शहर व तालुक्यातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या असोसिएशनच्या निर्णयाची पोलिसांना मदत होणार आहे. बैठकीमध्ये पोलिस निरीक्षक विलास पुजारी, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूरज लांडे,

cctv in front of medical and main road to help to police investigation reduce crime shevgaon ahmednagar
Ahmednagar : महापालिकेचा जन्म-मृत्यू विभाग कोमात; जन्मदाखल्यांसाठी पालकांची हेळसांड

जितेश केवळ, आशिष राठी, जोहेब पटेल, सोमनाथ साखरे, पांडुरंग लबडे, दुर्गेश काथवटे, मोहंमद सय्यद, फैजान सय्यद, संतोष निषवे, शिरीष घनवट, संकेत गवळी, विजय पायघन, ज्ञानेश्वर बडे, बाळासाहेब देशपांडे आदी उपस्थित होते.

मेडिकल स्टोअर शहरातील व तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकांत असल्याने, व ती अत्यावश्यक सेवेत असल्याने दिवसभरातील बहुतांश वेळ सुरू असतात. दिवसेंदिवस कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच पोलिसांना वाढता ताण कमी करण्यासाठी व तपासकामी मदत होण्यासाठी असोसिएशनने सामाजिक बांधिलकीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

- डॉ. सूरज लांडे, अध्यक्ष केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना, शेवगाव

cctv in front of medical and main road to help to police investigation reduce crime shevgaon ahmednagar
Ahmednagar : माझ्या जोडीला राहूल की राजेंद्र हे जनता ठरवेल; सुजय विखेंचे श्रीगोंद्यात सूचक विधान

समाजामध्ये कायदा- सुव्यवस्था राखणे पोलिसांबरोबरच प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, सोशल मीडिया, जातीय तणाव, चोरी, लुटमार यांचा ताण पोलिसांवर वाढला आहे. त्यामुळे मेडिकल केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने घेतलेल्या सीसीटीव्हीच्या उपक्रमामुळे पोलिसांप्रमाणेच सर्वांना मदत होणार आहे.

- विलास पुजारी, पोलिस निरीक्षक, शेवगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.