Ahilyanagar: अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'; महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी

central government has finally approved to Ahmednagar renamed as Ahilyanagar : अहमदनगरचे नामांतर 'अहिल्यानगर' असे करण्यास केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.
Ahilyanagar: अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'; महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी
esakal
Updated on

अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आली आहे. यादरम्यान राज्य सराकराने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

"अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!" अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याला रेल्वे मंत्र्यांनी मंजूर दिली होती. महिनाभरापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नामांतराची घोषणा केली होती.

अहिल्यानगर असं नामांतर का?

भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली शहरांची नावं बदलण्याचा सत्ताधारी पक्षाचा राजकीय अजेंडा आहे. त्यानुसार आत्तापर्यंत अनेक शहारांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. पण याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून.

मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास २८ वर्षे माळवा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवलं. या काळात त्यांनी देशभरात धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, बारवं, अनेक अन्नछत्रे उघडली. त्यामुळं अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं नाव या जिल्ह्याला देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.