Chance of a political earthquake in Jamkhed on Tuesday
Chance of a political earthquake in Jamkhed on Tuesday

वादळानंतर जामखेडमध्ये मंगळवारी होणार हा भूकंप

Published on

जामखेड ः दोन दिवसांपूर्वी राज्यात निसर्ग वादळ येऊन गेले. त्याचा फटका राज्याच्या किनारपट्टीला बसला. त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, जामखेड शहरात दुसरेच वादळ उठले आहे. त्या वादळाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. येत्या मंगळवारी भूकंप येण्याची शक्यता आहे.

वाढत्या राजकीय दबावतंत्राचे कारण पुढे करुन जामखेडचे नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.05) रोजी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषद सांगितले. मात्र हा 'राजकीय दबाव नेमका कोणाचा' या बाबत काही बोलण्यास 'नकार' दिला. 

जामखेडच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित अाहे. दोन वर्षापूर्वी निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून जामखेड नगरपालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा आवलंब होत आहे. त्यातच त्यांनी आपण राजीनामा देत आहोत," असे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी जाहीर करुन राजकीय 'खळबळ' उडवून दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने 'हाँटस्पाँट' राहिलेले जामखेड संपूर्ण राज्यात चर्चेत राहिले. कोरोनाची 'धाकधूक' कमी होते ना होते तोच नगरपालिकेच्या राजकारणाची 'धाकधूक' सुरू झाली आहे. येथे सुरू झालेले हे राजकारण नेमके कोणत्या वळणावर जाईल हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल.

एकवीस अधिकृत आणि दोन स्वीकृत नगरसेवक असलेली जामखेडची नगरपालिका साडेचार वर्षापासून निरनिराळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिली. नगरपालिकेच्या स्थापनेला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. निवडून आलेल्या नगरसेवक मंडळाला साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. आणखी या नगरसेवकांचा सहा महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. 

येथे साडेचार वर्षात अनेक राजकीय नाट्यमय घटना घडल्या. सुरुवातीला 'राष्ट्रवादी' काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता 'भाजप'च्या ताब्यात गेली. अखेरची सहा महिने राहिलेली असताना विद्यमान नगराध्यक्ष घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय अस्थिरता चव्हाट्यावर आणली. मात्र, प्रत्यक्ष घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी सुपूर्त केलेले 'ते' राजीनामे मंजूर केल्याचे जोपर्यंत जाहीर करीत नाहीत, तसेच ते स्वतः आपल्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जामखेडच्या राजकारणात बराच 'खल' होईल आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडेल हे मात्र निश्चित !

नगरसेवकांच्या राजीनाम्याचा राजकीय स्टंट! 

घायतडक म्हणाले," नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात दबावतंत्राचा आवलंब होत असल्याची माहिती आपण आपल्या सहकारी नगरसेवकांना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेवक प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन अशोक राळेभात, मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख या दहा नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचे राजीनामे आपल्याकडे सूपूर्त केले आहेत, असा दावा केला आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून माझ्यावर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा म्हणून राजकीय दबाव आणला जात आहे. हा दबाव वाढत जात आसल्याने मी स्वतः जामखेड नगरपरिपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (ता.09) नगरपालिकेच्या बैठकीनंतर सुपूर्द करणार आहोत. दहा नगरसेवकांनीदेखील आपल्या नगरसेवक पदांचा राजीनामा माझ्याकडे दिल्याचे निखिल घायतडक यांनी सांगितले.

माजी मंत्री राम शिंदेंना भूमिका करावी लागणार स्पष्ट

नगरपालिकेची सत्तेची सूत्रे माजी मंत्री राम शिंदेंच्या हाती अाहेत. शिंदेंच्या अशीर्वादानेच निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे सुरु झालेल्या 'राजीनामा' नाट्यात घायतडक यांच्यासह राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांसंदर्भात माजी मंत्री राम शिंदेंना आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी लागेल, हे मात्र निश्चित ! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.