Ahmednagar : कौटुंबिक वादातून सावळीविहीरमध्ये तिहेरी हत्याकांड

सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक
Crime
Crimesakal
Updated on

शिर्डी - कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील सावळीविहीर येथे पत्नी, मेहुणा व आजेसासू यांचा चाकूने वार करीत खून करून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (ता. २१) पहाटे नाशिक येथील शिंदे टोलनाक्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सुरेश ऊर्फ बाळू विलास निकम (वय ३२), रोशन कैलास निकम (वय २६, दोघे रा. संगमनेर खुर्द, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वर्षा सुरेश निकम (वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (२५), हिराबाई धृपद गायकवाड (वय ७०, सर्व रा. सावळेविहीर, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव-शिर्डी रोडवर सावळीविहीर गाव आहे. संशयित सुरेश निकम याचे वर्षा हिच्याशी नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.

मात्र, किरकोळ घरगुती कारणातून वर्षाचे नेहमीच माहेरी निघून येण्यावरून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी वाद होऊन पती सुरेश निकम याच्या विरोधात संगमनेर पोलिसांत वर्षाने तक्रार दिली होती. दरम्यान, वारंवारच्या वादातून संतप्त झालेला संशयित सुरेश व त्याचा चुलत भाऊ रोशन यांनी बुधवारी (ता. २०) रात्री साडेअकरा वाजता सावळीविहीर गाठले. दरवाजा उघडताच संशयित दोघांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी समोर येईल त्याच्यावर सपासप वार केले.

Crime
Solapur News : तीन वेळा अपयश,नकारात्मक न होता,विद्याची जिद्दीने यशाला गवसणी

यात वर्मी घाव बसल्याने सुरेशची पत्नी वर्षा, मेहुणा रोहित व आजेसासू हिराबाई हे तिघे जागीच गतप्राण झाले, तर सासरे चांगदेव गायकवाड, संगीता गायकवाड, योगिता गायकवाड हे गंभीर जखमी झाले. घरातील सर्व रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून पोबारा केला. नागरिकांनी जखमींना तत्काळ शिर्डी रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिघांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती कळताच शिर्डी पोलिस व नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Crime
Sambhaji Nagar : जिल्हा परिषद झाली ‘हायटेक’

अशी झाली कारवाई अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून नाशिक, संगमनेर, मनमाड, राहुरी, श्रीरामपूर पोलिसांना घटनेची माहिती देत, संशयित त्या दिशेने येण्याची शक्यता वर्तविली. त्यानुसार या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. या संदेशाप्रमाणेच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे गस्तीपथक शिंदे टोलनाका येथे दबा धरून होते. गुरुवारी (ता. २१) पहाटे सव्वातीन-साडेतीनच्या सुमारास दोघे संशयित पल्सर दुचाकीवरून येत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नाशिकच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Crime
Sambhaji Nagar Update : शहरासाठी १०० ई-बस,शासनाला पाठविला स्मार्ट सिटीने प्रस्ताव

कौटुंबिक वादातून हत्या काही दिवसांपूर्वी आरोपी सुरेश निकम याच्या विरोधात पत्नी वर्षा हिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सुरेश व त्याचे कुटुंबीय आपल्याला त्रास देतात, असे तीत म्हटले होते. वर्षा सध्या सावळीविहीर येथील आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. पुन्हा नांदायला येण्याची मागणी आरोपी तिच्याकडे करत होता, परंतु वाद मिटले नाहीत आणि वर्षा नांदायला गेली नाही. या रागातूनच आरोपीने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()