मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - विखे पाटील

केंद्रीय तपास यंत्रणेच्‍या अधिकाऱ्याला धमकाविण्‍याचा प्रकार यापूर्वी राज्‍यात कधीही घडला नव्‍हता. तपास यंत्रणांना बदनाम करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा मुख्‍यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्‍यावा.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilesakal
Updated on

शिर्डी (जि. नगर) : केंद्रीय तपास यंत्रणेच्‍या अधिकाऱ्याला धमकाविण्‍याचा प्रकार यापूर्वी राज्‍यात कधीही घडला नव्‍हता. तपास यंत्रणांना बदनाम करणाऱ्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुख्‍यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्‍यावा. बेताल वक्‍तव्‍ये करणाऱ्या वनस्‍पतींचे समूळ उच्‍चाटन करण्‍याचे धाडस त्‍यांच्‍या पक्षातील नेत्‍यांनी दाखवावे, असे थेट आव्‍हान भाजप (BJP) नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला दिले.

राज्‍य सरकारने आपली भूमिका जाहीर करावी

केंद्र सरकारच्या मोफत लसीकरण मोहिमेचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण झाला. या मोहिमेत योगदान देणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक यांच्या सन्मानप्रसंगी ते बोलत होते.
आमदार विखे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारची अवस्‍था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे, एवढाच धंदा सुरू आहे. लसीकरण जास्‍त झाले तरी स्‍वतःची पाठ थोपटून घेण्‍यातच त्‍यांनी धन्‍यता मानली. सहकारी साखर कारखान्‍यांबाबत‍ही राज्‍य सरकार दुजाभाव करीत आहे. विरोधकांच्‍या कारखान्‍यांना थकहमी नाकारली जात आहे. मात्र, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल.’’ राज्‍य सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, असेही विखे म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी घेतला आमटी-भाकरीचा आस्वाद

''सर्वसामान्य नागरिकांना लसीचे संरक्षण कवच देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून कंपन्यांना लस उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास कंपन्यांना मिळाला. इतर देशांनाही लस देण्याचे मोठे दायित्व पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने निभावले. संपूर्ण जगात आत्मनिर्भर भारताची ही ओळख ठरली.'' - राधाकृष्ण विखे पाटील, आमदार

माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्‍यक्ष अशोक पवार, किसन विखे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, तालुका आरोग्‍याधिकारी डॉ. प्रमोद म्‍हस्‍के, हर्षदा शिरसाठ, डॉ. दत्तात्रय जोरी, डॉ. रावसाहेब गायकवाड यांच्‍यासह आरोग्‍य कर्मचारी व ग्रामस्‍थ उपस्थित होते. म्हस्के, गोंदकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्‍ताविक माजी उपसरपंच अनिल विखे यांनी केले.

Radhakrishna Vikhe Patil
हसन मुश्रीफ म्हणाले, 'अजूनही जिल्ह्याचा पालकमंत्री मीच'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.