साहेब, तुम्ही आलात स्वागतंय, कामे केल्यास हिरो व्हाल

श्रीगोंद्यात नव्याने बदलून आलेले तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडून सामान्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
citizens have high expectations from newly changed tehsildar of shrigonde milind Kulthe
citizens have high expectations from newly changed tehsildar of shrigonde milind KultheSakal
Updated on

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : श्रीगोंद्यात नव्याने बदलून आलेले तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडून सामान्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सामान्यांची कामांसाठी होणारी ससेहोलपट व हेलपाटे थांबवावे लॉगतीलच, शिवाय गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जालीम उपाययोजना कराव्या लागतील. नेत्यांना खुश ठेवून भागणार नाही तर सामान्यांची सकारात्मक चर्चा होण्यासाठी त्यांना संवाद ठेवावा लागेल. पहिल्या टप्यात तरी त्यांनी त्या दिशेने पावले टाकलीत.

यापूर्वीचे तहसीलदार प्रदीप पवार यांची लवकर उचलबांगडी झाली. त्यांची येथे पहिलीच पोस्टींग असल्याने त्यांना श्रीगोंदेकर समजले नसावेत. त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजून न घेतल्याने त्यांना लवकर जावे लागले. त्यांच्या जागी कुलथे आले आहेत. कुलथे येथे येण्यास अनेक वर्षांपासून इच्छूक होते. तशी फिल्डींगही मागच्यावेळी त्यांनी लावली होती. मात्र, पवार यांनी बाजी मारल्याने त्यांना वाट पाहावी लागली. अखेर त्यांनी श्रीगोंद्यात येत कामही सुरू केले.

सामान्यांच्या कामांचे ओझे जास्त नसले तरी पेंडन्सी वाढल्याने लोकांची गर्दी कायमच तहसील कार्यालयात असते. या गर्दीचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पेडींग कामांना दिल्यास नक्की उपयोग होईल. त्यासाठी त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांची मदत घेतली तर त्यात अजून सुधारणा होईल, असे महसूलमधील जाणकारांचे मत आहे.

citizens have high expectations from newly changed tehsildar of shrigonde milind Kulthe
प्रेयसीपाठोपाठ त्यानंही सोडलं जग; सिडको परिसरातील घटना

काळाबाजार रोखल्यास चांगले वळण लागेल

तालुक्यात अनेक बोगस शिधापत्रिकाधारक आहेत. मात्र, गरजू लोकांना त्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. जे बोगस व गरज नसणारे शिधापत्रिका धारक आहेत. त्यांचे आलेले धान्य काळ्याबाजारात जाते. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा श्रीगोंद्यात कार्यरत आहे. काळाबाजार कोण करते, कुणाची साखळी आहे, याची सगळी माहिती प्रशासनाला माहिती आहे. कारवाई मात्र होत नाही. कुलथे यांना ही साखळी तोडता आली तर तालुक्याला एक चांगले वळण लागेल.

निवृत्त कर्मचारी कशासाठी येतात

तहसील कार्यालयातील दलालांमुळे सामान्यांचे कामेच होत नाहीत. कार्यालयीन वेळ संपल्यावर सेवानिवृत्त कर्मचारी कशासाठी तेथे असतात, याचाही तहसीलदारांना शोध घ्यावा लागेल. वाळू, मुरुम चोरांचे मोठे रॅकेट तालुक्यात आहे. ही चोरी बंद होणार नसली तरी त्यात मर्यादा याव्यात यासाठी ठोस व प्रामाणिक उपाययोजना कुलथे करु शकतात. त्यांनी आल्यापासून कामाची चांगली पद्धत सुरू केलीय. ही सकारात्मक बाजू आहे.

तालुका मोठा असून येथील काम समजून घेत आहे. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेवून कामात सुधारणा करण्यात येतील. त्यासाठी काही वेळ लागेल. मात्र, निश्चित सामान्यांची कामे वेळेवर होतील यासाठी प्रयत्न करू.
-मिलिंद कुलथे, तहसीलदार श्रीगोंदे.

citizens have high expectations from newly changed tehsildar of shrigonde milind Kulthe
युवा शेतकऱ्यांची औषधी शतावरीची लागवड, इतरांसाठी ठरतेय नवा पर्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.