'या' लोहमार्गास मान्यता द्या; साईभक्तांची गैरसोय टळेल

shirdi
shirdiesakal
Updated on

शिर्डी (जि.अहमदनगर) : साईबाबांची शिर्डी (shirdi) , मराठवाडा (marathwada) व दक्षिण भारत लोहमार्गाने जोडण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनी आज (ता. १७) कोपरगाव ते रोटेगाव लोहमार्गाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता द्यावी. या नियोजित लोहमार्गामुळे दाक्षिणात्य भाविकांचा रेल्वेप्रवासाचा वेळ व खर्च वाचेल. मराठवाड्याचा काही भाग व कोपरगावच्या पूर्वभागाच्या विकासाला चालना मिळेल.

बऱ्याच दुष्काळी गावांना होईल फायदा
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगावातील प्रवाशांना रेल्वेने औरंगाबाद अथवा नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड येथून रेल्वे धरावी लागते. कोपरगाव-रोटेगाव लोहमार्ग झाल्यास कोपरगाव-मनमाड-औरंगाबाद या मार्गावरील जास्तीचे एकूण ९४ किलोमीटर अंतर कमी होईल. प्रवाशांचा वेळ व खर्च वाचेल. या लोहमार्गामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच मराठवाड्याच्या सीमेवरील वैजापूर तालुक्यातील बऱ्याच दुष्काळी गावांना फायदा होईल. या मार्गावरच उक्कडगाव रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. त्यातून या परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळेल. तसेच मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक तारांकित चौकोन तयार होईल. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या कोपरगाववरून शिर्डीकडे वळविता येतील. आपण या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांना दिली.

shirdi
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक
shirdi
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणाची रेल्वे समोर येवून आत्महत्या


कोपरगाव ते रोटेगाव या लोहमार्गाची मागणी फार जुनी आहे. मराठवाड्यातील नेत्यांनी त्यासाठी यापूर्वी आंदोलने केली. साईबाबांच्या शिर्डीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रवासी संघटनेने देखील ही मागणी लावून धरली. आपण यात लक्ष घातले असून, नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. सरकारदरबारचा प्रस्ताव मार्गी लागल्यास पुढील पाठपुरावा सुरू करता येईल. - आशुतोष काळे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.