निर्बंधांमुळे सहकारी बँका अडचणीत : महसूलमंत्री थोरात

Revenue Minister Balasaheb Thorat
Revenue Minister Balasaheb Thoratesakal
Updated on


संगमनेर (जि. अहमदनगर) : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) राष्ट्रीय व खासगी बँकांना काहीशी मोकळीक दिली असली, तरी सहकारी बँकांवर अत्यंत जाचक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध बँकिंग क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहेत, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले.


अमृतवाहिनी बँकेने सातत्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते.

थोरात म्हणाले,

‘‘अडचणीच्या बँकिंग व्यवस्थेत फार काटेकोरपणे काम करावे लागते. जाचक निर्बंधाच्या परिस्थितीमध्येही अमृतवाहिनी बँकेने तालुक्याची आर्थिक कामधेनू म्हणून शेतकरी व तरुणांना मोठी आर्थिक मदत केली. काही सहकारी बँकांमध्ये चुकीची कामे होत असतील, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र, चांगल्याच्या पाठीशी उभे रहायला हवे.’’

Revenue Minister Balasaheb Thorat
ग्रामसेवकाची नोकरी कुणी स्विकारेना; तब्बल 100 पदे रिक्त


केंद्र सरकारवर साधला निशाणा

संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांमध्ये सुमारे एकवीसशे कोटींच्या ठेवी असून, कार्यरत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका, चांगला सहकार, शैक्षणिक, समाजकारण, राजकारण व सांस्कृतिक वातावरणामुळे संगमनेरची बाजारपेठ समृद्ध झाली आहे. बँकेत 450 कोटींच्या ठेवी असून, या वर्षी बँकेने 652 कोटींचा व्यवसाय केला आहे. बँकेने सातत्याने ऑडिट वर्ग अ राखल्याची माहिती अमित पंडित यांनी दिली.

‘‘काही मूठभर उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज माफ होते आणि पुन्हा ते नव्याने कर्ज घेतात, याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते आहे. गोरगरिबांच्या प्रपंचाशी निगडित सहकारी बँकांवर निर्बंध लादले जात आहेत.’’ - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

Revenue Minister Balasaheb Thorat
अगस्ती कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी साथ द्या - मधुकर पिचड


उद्योजक हासे यांचा सत्कार

नियमित कर्जफेड करणारे कर्जदार के. बी. घुले, सोमनाथ गुंजाळ, बाबासाहेब पावसे आदींसह कोरोना संकटामध्ये पालक गमावलेल्या 14 मुलींचे पालकत्व घेणारे उद्योजक नितीन हासे यांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, उद्योगपती राजेश मालपाणी, गणपतराव सांगळे, संतोष हासे, बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, रामहरी कातोरे, राजेंद्र गुंजाळ, सुभाष गुंजाळ व्यवस्थापक रमेश थोरात आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.