Coffe Whit Sakal - शेतमाल, साखर, दुधाचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. तिकडे लक्ष देण्याची गरज असताना भाजपवाले इतर पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत. समोरचा नेता ठाम राहिला तर चौकशा लावून त्रास द्यायचा, हे त्यांचे उद्योग जनतेला समजत नाहीत असे नाही. आगामी निवडणुकीत . आपण अजिंक्य असल्याचे त्यांनी गृहित धरू नये, असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.
‘सकाळ’च्या नवीन कार्यालयात प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्रीगणेशाची आरती तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संपादकीय टीमशी संवाद साधला. आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
‘भारतीय जनता पक्षाच्या काळात सुरू झालेल्या सर्व योजना दिखाऊ आहेत. जाचक अटींमुळे जनतेच्या हाती काहीच लागत नाही. आकर्षक लेबल लावून योजना सुरू केल्या जातात. प्रत्यक्षात त्यात काहीच नसते,’’ असा त्यांनी केला.
ते म्हणाले, की हर घर जलअंतर्गत सध्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे, पण पाण्याचा स्रोत कुठे आहे? सर्वच वाड्या-वस्त्यांवर पाणी मिळेल का, असे अनेक प्रश्न पडत आहेत. त्याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. मिरी पाणी योजना, बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी योजनांना कमी असलेल्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणी आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचे तसेच झाले.
अनेक जण वंचित आहेत. निवडणुका जवळ आल्या, की अशा योजनांचा फार्स होतो. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दोन महिन्यांपासून अनेकांना मिळाले नाहीत. हे सरकार केवळ एसटीवर जाहिराती करते. प्रत्यक्ष लाभार्थी वंचित राहतो, हे दुर्दैव आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार व मी जिल्हाभर पक्ष बळकट करण्यासाठी फिरतोय, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवितो. आम्ही दोघांनीही जिल्ह्यात लक्ष घातले आहे. आगामी काळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. राष्ट्रवादी पक्ष अधिक बळकट करण्यासाठी वातावरण चांगले आहे, कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले काम जिल्ह्याला माहिती आहे. शेतकरी पवार साहेबांच्या पाठीशी आहेत, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचीही चौकशी करा
आमदार तनपुरे म्हणाले, की राज्य सहकारी बॅंकेची चौकशी होते, तशी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेची का होत नाही? काही कारखान्यांना नियम डावलून कर्ज दिलेय. संचालकांच्या गाड्या, परदेश दौरे याची चौकशी होण्याची गरज आहे. कारखाना उभारताना मी चुकीचे काही केले नाही. त्यामुळे ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही. कोणत्याही दबावाच्या राजकारणाला आपण सामोरे जाऊ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.