शिरापूरमध्ये 50 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

गावातील रूग्णास तातडीने गावातच उपचार मिळावेत, या हेतूने हे कोविड सेंटर सुरू केले आहे.
 shirapur
shirapur Esakal
Updated on
Summary

माझ गाव माझी जबाबदारी या उक्तीने त्यांनी गावातील रूग्णास तातडीने गावातच उपचार मिळावेत, या हेतूने हे कोविड सेंटर सुरू केले आहे.

पारनेर (अहमदनगर) : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आजही रूग्णास शहरात बेड मिळत नाहीत याचा विचार करूण शिरापूरचे रहिवाशी व जिल्हापरिषदेचे कृषी व पशूसंवर्धनचे माजी सभापती मधूकर उचाळे यांनी फक्त आपल्या गावासाठी 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल आहे. त्याचे उद्या सोमवारी (ता. 26 ) लोकार्पण होत आहे. या सेंटरमध्ये 25 बेड साधे व 25 बेड ऑक्सिजनचे असे 50 बेडची सुविधा करण्यात आली आहे. माझ गाव माझी जबाबदारी या उक्तीने त्यांनी गावातील रूग्णास तातडीने गावातच उपचार मिळावेत, या हेतूने हे कोविड सेंटर सुरू केले आहे.

सध्या कोरोना रूग्णांना शहरात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अनेक रूग्ण घरच्याघरीच जुजबी तात्पुरते उपचार करूत राहतात. परिणामी आजार बळावतो व अनेकदा रूग्ण दगावण्याचाही धोका वाढतो. तसेच त्यामुळे घरातील इतर सदस्यांना या आजाराची लागण होते. व अवघे कुटुंबच या आजाराला बळी पडते. त्यासाठी आपले गाव आपली जबाबदारी असे मानून उचाळे यांनी फक्त् गावातील लोकांसाठी 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा मानस केला असून ते सोमवारपासून सुरू होत आहे.

या ठिकाणी फक्त गावातील लोकांनाच सुविध देण्यात येणार आहेत. जर रूग्णास तातडीने गावातच सुविधा मिलाली तर तो लगेचच कोविड सेंटरमध्ये भरती होईल व त्यामुळे घरातील इतर सदस्य या आजारापसून वाचतील व या आजाराच्या प्रसारास आळा बसणार आहे. खेडेगावातील रूग्णांना शहरात बेडही मिळत नाही ही समस्या ध्यानात घेऊन या गावाने आपल्या गावाची जबाबदारी आपणच घेऊ, या हे हेतूने हे कोविड सेंटर सुरू करणार आहेत. या कोविड सेंटरसाठी डॉ.भास्कर शिरोळे व गावातीलच डॉ.संतोष उचाळे काम पाहणार आहेत. तसेच आणखीनही एखादा डॉक्टर व नर्सेसच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. गावातील प्राथमिक शाळा तसेच सेवासंस्थेच्या इमारतीमध्ये हे कोविड सेंटर ऊभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आमच्या गावातील रूग्णांस शहरात बेड मिळविण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. जर ऑक्सिजन बेड किंवा वेळेत उपचार मिळाले नाहीत तर अनेकदा रूग्ण दगावत आहेत. आपल्यातून चांगली व तरूण माणसेही जात आहेत. याचे खूप मोठे दुःख आहे, याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. भविष्यात हा आजार मोठ्या प्रमाणावर फोपावण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठ मोठ्या गावात अशी कोविड सेंटर उभी करणे गरजेचे आहे.

- मधूकर उचाळे, माजी सभापती कृषी व पशूसंवर्धन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()