कोरोना संकटात कर्जतचा महसूल धावला आरोग्य विभागाच्या मदतीला

In the Corona crisis, Karjat's revenue ran to the aid of the health department
In the Corona crisis, Karjat's revenue ran to the aid of the health department
Updated on

कर्जत: महसूल विभागाला विविध कारणांनी टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनंतर सर्वाधिक टीकेचा धनी कोण होत असेल तर तो महसूल विभाग. परंतु असे असले तरी विभागातील सर्वच अधिकारी गैरमार्गाने जात नाही. कित्येक वेळा टीकेत आणि आरोपांमध्ये तथ्य नसते. कर्जतसह सर्वत्रच कोरोनाचे संकट आहे. त्यातून सावरण्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला महसूल विभाग धावून गेला आहे.

कोरोना महामारीच्या संकटात प्रसंगी प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचा जीव वाचविणारे आरोग्य विभागातील सर्व कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी श्रीमती अर्चना नष्टे यांनी काढले.

आज प्रांताधिकारी, तहसील व कृषी कार्यालय तसेच तलाठी व मंडलाधिकारी संघटना यांचे वतीने वैयक्तिक निधी संकलन करीत आरोग्य विभागास मोफत दोनशे दहा पीपीई किट देण्यात आले. 

ते प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी श्रीमती अर्चना नष्टे यांचे हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी स्वीकारले. या वेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुनील हसबे, कृषी विभागाचे दत्ता घोडके, श्रीरंग अनारसे आदी उपस्थित होते.

अर्चना नष्टे म्हणाल्या, कोरोनाबाबत योग्य काळजी, खबरदारी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हा एकमेव उपाय आहे. सर्वांनी फक्त आवश्यक कामासाठीच मास्क आणि सानिटायझर चा वापर करीत घराबाहेर पडावे. तसेच बाहेरसुद्धा सोशल डिस्टन्स ठेवावे. आजची काळजी ही उद्याची सुरक्षा आहे. प्रास्ताविक सुरेश वाघचौरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ संदीप पुंड यांनी मानले.

संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()