वृद्ध दाम्पत्याने बियाण्यांतून साकारला विठुराया

वृद्ध दाम्पत्याने बियाण्यांतून साकारला विठुराया

Published on

अकोले (जि. नगर) : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून पंढरीची वारी बंद आहे. मात्र, पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेल्या तालुक्यातील देवगावातील मानताबाई देवराम भांगरे व देवराम भांगरे या दाम्पत्याने मुलांच्या साह्याने अंगणातच विठुरायाला पाचारण केले. एकादशीनिमित्त बियाण्यांचा वापर करून विठुरायाची प्रतिकृती साकारली. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या आदिवासींनी हजेरी लावली. (couple used seeds to make a replica of Vitthal in akole)

आषाढी एकादशी म्हटली, की संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पंढरीरायाकडे लागतात. या उत्सवात वारकरी टाळ-मृदंग, पखवाजाच्या गजरात अभंग गात आसमंत दुमदुमून सोडतात. विठुरायाच्या दर्शनासाठी खेड्यापाड्यांतून भाविक पंढरपुरात जमा होतात. मात्र, काही भाविकांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. पांडुरंगाचे भक्त याही परिस्थितीत आपल्या आराध्य दैवताचे दर्शन कुठल्या ना कुठल्या स्वरूपात घेतातच. मानताबाई देवराम भांगरे व देवराम भांगरे या दाम्पत्याने मुलांच्या साह्याने अंगणातच विठुरायाला पाचारण केले. एकादशीच्या निमित्ताने आपल्या अंगणात पारंपरिक बियाण्यांचा वापर करून विठुरायाची प्रतिकृती साकारली.

त्यांनी कल्पकतेने वेगवेगळ्या आकारांतील, रंगांतील बिया वापरून ही प्रतिकृती साकारली. म्हणतात ना, देव आपल्या कामात असतो! तेच या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. साक्षात विठुराया देवगावातील त्यांच्या झोपडीमध्ये विसावला, असाच भास या ठिकाणी होत आहे. भाविक विठुरायाला वेगवेगळ्या रूपांत पाहत असतात. या दाम्पत्याने विठुरायाला पारंपारिक बियाणे, निसर्गातील पानाफुलांत पाहिले आहे.

अकरा प्रकारच्या बियांचा वापर

पांडुरंगाची प्रतिकृती साकारण्यासाठी मानताबाई यांनी तूर, मूग, उडीद, अबई, हरभरा, नागली, वरई, भात, वाल आदींच्या बियांचा वापर केला.

(couple used seeds to make a replica of Vitthal in akole)

वृद्ध दाम्पत्याने बियाण्यांतून साकारला विठुराया
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले : बावनकुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()