अहमदनगर सिटी केअर रुबी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडसह कोविड विभाग

हॉस्पिटलमध्ये कोरोनाची अँटिजेन चाचणी पूर्णत: मोफत
Ruby Hall Clinic Covid Department
Ruby Hall Clinic Covid Departmentsakal
Updated on

अहमदनगर : तारकपूर परिसरातील सिटी केअर रुबी हॉल क्लिनिक(Ruby Hall Clinic) हॉस्पिटलमध्ये कोरोनाची (Corona) अँटिजेन चाचणी पूर्णत: मोफत करण्यात येत आहे. येथे १७ व्हेंटिलेटर बेडसह स्वतंत्र स्पेशल कोविड विभाग (Covid Department) कार्यान्वित आहे. तज्ज्ञ डॉ. अमित आहाळे (Dr. Amit Ahale) यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्णांवर उपचार होणार असल्याचे डॉ. संदीप सुराणा यांनी सांगितले.

Ruby Hall Clinic Covid Department
Pune : सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकींसह २ रिक्षा खाक

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिटी केअर रुबी हॉल हॉस्पिटलने आपली आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी केली आहे. या ठिकाणी रुग्णांची अँटिजेन चाचणी पूर्णत: मोफत केली जात आहे. कोविड रुग्णांवर शासकीय दरानुसार उपचार केले जात आहेत. डॉ. अमित आहाळे यांच्यासह प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र कोविड विभाग कार्यरत आहे. कोविडव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीविकार, मेंदूविकार, अर्धांगवायू, सर्पदंश, विषबाधा, पेशींचे आजार, तापाचे आजार, डेंगी, मलेरिया, चिकुनगुन्यासह इतर आजारांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चांगली उपचार सुविधा उपलब्ध आहे. सुसज्ज आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तपासणीसाठी मशिनरी उपलब्ध आहे. आतापर्यंत अनेकांनी येथील सुविधांचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.