अभिनय फसला अन्‌ जेलमध्ये बसला..! गुन्हे शाखेची कारवाई

ahmednagar crime
ahmednagar crimeesakal
Updated on

अहमदनगर : शहरातील झोपडी कॅन्टीन येथील प्रकाश वाईन्स या दुकान व्यवस्थापकाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणाऱ्या पाच आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दुकानातील कामगार आरोपी लखन नामदेव वैरागर (वय २९, रा. नागापूर, नगर) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

डोळ्यावर मिरची पावडर फेकली.

प्रकाश वाईन्स या दुकानाचे व्यवस्थापक आशिर बशीर शेख (रा. पंचवटीनगर, सावेडी) हे ता. १२ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दिवसभर जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळेस सारस्वत बॅंकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली. दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली दहा लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरली. शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ahmednagar crime
भविष्यवाण्या झाल्या तरी आघाडीला धोका नाही - थोरात

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहरचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तात्काळ घटनास्थळास भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले होते. त्यामध्ये कामगार लखन वैरागरची भूमिका संशयास्पद वाटली होती. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी प्रमोद बाळू वाघमारे (वय २३, रा. अण्णाभाऊ साठे समाज मंदिर शेजारी, नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (वय २५, रा. रस्तापूर, ता. नेवासे), दीपक राजू वाघमारे (वय २०, रा. सेंट मेरी चर्च पाठीमागे, नागापूर) यांना अटक करण्यात आले. दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

ahmednagar crime
तर... आमदारकीला कर्डीलेही ठोकणार श्रीगोंद्यातून शड्डू

या आरोपींकडून पाच लाख २० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींना तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()