Social Media : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई; गुन्हा दाखल करण्याचा इशारा - चंद्रशेखर यादव

सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन्सला सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली
crime register of social media offensive posts chandrashekhar yadav ahmednagar
crime register of social media offensive posts chandrashekhar yadav ahmednagaresakal
Updated on

अहमदनगर : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मांत तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत.

शहरात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जात असून, दोन जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत.

crime register of social media offensive posts chandrashekhar yadav ahmednagar
Social Media Precaution : सावधान! सोशल मीडियावर अतिउत्साहाने व्यक्त होऊ नका.... नाहीतर

त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज, फोटो आणि मजकूर यावर विश्वास ठेवू नये, तसेच आलेले मेसेज फॉरवर्ड करू नयेत. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोणी आक्षेपार्ह मेसेज केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक यादव यांनी दिला आहे.

‘ओन्ली अ‍ॅडमिन’ ही सेटिंग

सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन्सला सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनने ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ ही सेटिंग करण्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

crime register of social media offensive posts chandrashekhar yadav ahmednagar
Ahmednagar News : बाजारपेठेवर सीसीटीव्हीचा वॉच; पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यास मदत

कायदा हातात घेऊ नका

सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसांत वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.