Crime: क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करणाऱ्या 'त्या' दोघांना झाली जन्मठेप

Court Order: न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले. शासनातर्फे ॲड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.
Crime: क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करणाऱ्या 'त्या' दोघांना झाली जन्मठेप
Updated on

Nagpur Latest Update: क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करणाऱ्या दोघांना सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेप, प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

फरदीन ऊर्फ शेरखान मुजीब खान (वय २५, रा. ताजनगर) आणि फरदीन खान हमीद खान (वय २२, रा. टेका नाका) अशी दोघांचे नावे आहे. त्यांच्यावर इमरोज ऊर्फ इम्मू राशीद कुरेशी (वय २०, रा. हमीदनगर) याच्या हत्येच्या आरोपात यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या प्रकरणात सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. नागलकर यांनी निर्णय दिला. ही घटना संजय गांधीनगर परिसरात २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. इम्मू हा आरोपींचा मित्र होता. मात्र, तो आपल्या शत्रू गटाच्या संपर्कात असल्याचा संशय आरोपींना होता.

त्यामुळे त्याच्याशी वाद घातला. ‘तू माझ्या शत्रूंशी का बोलतो? तूच माझा मित्र बाबूचा गेम केला. तुझ्या मनात माझ्याबद्दल काळेबेरे आहे,’ असे म्हणत फरदीन इम्मूच्या अंगावर धावून गेला. इम्मू त्याच्या मित्राच्या गाडीवर बसलेला असताना त्याने इम्मूच्या पाठीवर चाकूने वार केला. यात इम्मू खाली पडला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून त्याच्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले. शासनातर्फे ॲड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.