Ahmednagar News : तलवारीनं केक कापणं हा कोणता पुरुषार्थ!

नेत्यांच्या बगलबच्च्यांवर पोलिस कारवाई करतील का? निर्णय चांगला..! पण, अंमलबजावणीचे काय?
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर केक कापून फटाके फोडून शांतता, सुव्यवस्था भंग करणाऱ्यांचा वाढदिवस आता पोलिस ठाण्यात साजरा करण्याचा इशारा कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. त्याचे स्वागतच आहे. पण, खरंच अंमलबजावणी होणार का ? असे किती वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये साजरे करणार, हा ही प्रश्‍न आहे.

प्रकाश पाटील

हल्ली सण-उत्सव सारे मिळून साजरे करीत असतात. याचे नेहमीच स्वागत होते. तरीही सार्वजनिक उत्साहातही शांतता भंग होतेच. डॉल्बीमुळे कोणते परिणाम होतात, किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांना बहिरेपण आले ? हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. सण साजरे कसे करायचे, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे. सार्वजनिक उत्साहात जनजागृती अपेक्षित असते. पण बऱ्याचदा अपेक्षाभंग होतो.

ahmednagar
Atiq Ahmed : अतिक अहमद यांना लोकसभेत वाहिली श्रद्धांजली; अध्यक्ष ओम बिरला म्हणाले...

मुद्दा असा आहे की, आता रस्त्यावर रात्री उशिरा केक कापणे हे कोणत्या नियमात बसते. एखाद्या काका, दादा, भाईंचे समर्थक असे वाढदिवस साजरे करण्यासाठी सर्वांत पुढे असतात. फ्लेक्स झळकतात. शहर विद्रुप करतात. हे सगळं नित्याचंच झालं. बिचाऱ्या सामान्य आणि सुसंस्कृत लोकांना याचं काही देणंघेणं नसतं. तुमच्या त्या फ्लेक्स अन्‌ रात्रीच्या वाढदिवसाचं कोडकौतुकही नसतं. तुमच्या असल्या थिल्लर मनोरंजनात काही स्वारस्यही नसतं. परंतु, असे वाढदिवस साजरे करण्याचा त्रास आणि पश्चात्ताप मात्र लोकांनी का सहन करावा? बरं असे वाढदिवस साजरे करणाऱ्यांच्या विरोधात कोणी ब्र काढत नाही. कशाला भानगडीत पडा.

दरवाजा लावून घरात बसलेलं बरं, अशी मानसिकता असतेच. असे कमी लोक असतात की ते धाडस दाखवितात. गुंडापुंडांच्या विरोधात आवाज उठवितात. त्यांना किंमतही मोजावी लागते. अनेकदा पोलिस राज्यकर्त्यांच्या बगलबच्च्यांची बाजू घेतात आणि तक्रारदाराला दोन शहानपणाच्या गोष्टी सांगतात. डॉल्बी किती वाजेपर्यंत लावायची आणि धुडगूस किती तास घालायचा, यालाही काही काळवेळ आहे की नाही?

ahmednagar
Ahmednagar News : जिल्ह्याचे कामकाज ठप्प!

नगर असो की मुंबई, पुणे. प्रत्येक ठिकाणी वाढदिवस साजरे करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण, त्यांचं कोणी काहीच बिघडू शकत नाही. बेधूंद व्हायचं, तलवार आणायची, केक कापायचा, डॉल्बी लावायाची, वेडेवाकडे नृत्य करायचे, हे सगळं किळसवाणे आहे. बरं इतक्यावरच न थांबता त्याचे ‘रिल’ करायचे.

सोशल मीडियावर व्हायरल करायचे. दहशत निर्माण करायची. हे सगळं थांबवायचं असेल तर केवळ कायद्याचा बडगा दाखवूनही चालणार नाही. तर त्यासाठी जनजागृतीही करावी लागेल. तलवार बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. आतापर्यंत तलवारीने जे केक कापले त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले का? की जे केक तलवारीने कापले जातात त्या तलवारी प्रतीकात्मक असतात की, खऱ्या असतात याचाही पोलिसांनी शोध घ्यायला हवा.

वेळप्रसंगी भाई, दादांच्या बगलबच्च्यांना कायद्याच्या भाषेत ‘नीट’ समजावून सांगावं लागेल. एकलंच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिस ठाण्यात असे वाढदिवस साजरे केले जावेत. ते माध्यमातून जनतेसमोर आले तर असे किळसवाणे वाढदिवस नक्की थांबतील. ज्या दिवशी हे प्रकार थांबतील त्यादिवशी पोलिस प्रशासनाचे अभिनंदन सामान्य नागरिक निश्चित करतील. तोपर्यंत अंमलबजावणीचे काय? हा प्रश्‍न लोकांबरोबर आमचाही आहे. तसेच पराक्रम दाखविण्यासाठी अशी कितीतरी क्षेत्र आहेत, की तुमचे नाव जिल्ह्यातच नव्हे, तर देशातही चमकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.