अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीत मतदारांचा घर क्रमांक माहीत नसल्यास तो शून्य दाखविण्यात आला आहे. नेमकी हिच उणीव सायबर गुन्हेगारांनी हेरलीय. या माध्यमातून मतदारांना टार्गेट करत आहेत. वैयक्तिक माहिती मागविताना ओटीपी विचारला जात असल्याने मतदारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मतदार यादीत नवीन नाव नोंदणी, नोकरी, व्यवसायामुळे स्थलांतर झालेल्यांचा समावेश आहे. पत्त्यामध्ये बदल झालेला आहे. नवीन नाव नोंदणी करणाऱ्यांना घर क्रमांक माहीत नाही. घर क्रमांक माहीत नसल्यास घर क्रमांक शून्य अशी सर्रास नोंद बीएलओंनी केली आहे.
मतदार यादीमध्ये ज्यांची नावे जुनीच आहेत. त्यांच्या घर क्रमांकही शून्य दाखविण्यात आला आहे. मतदार यादीतील या त्रुटीचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलवर संपर्क करून मतदार यादीत ‘तुमचा घर क्रमांक शून्य झाला आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी आली आहेत.