अहमदनगर : सायबर डाका, बडा धोका

कोणतीही जिवित हानी न करता कोट्यवधींची लूट केली जाते
Cyber robbery big risk
Cyber robbery big risksakal
Updated on

अहमदनगर : दरोडा टाकून लूट, चोरीसाठी खून अशा गुन्ह्यांऐवजी आता सायबर डाका टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जिवित हानी न करता कोट्यवधींची लूट केली जाते. अगदी काही क्लिकवर बँक अकाउंट साफ केले जाते. फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईट हॅक ही लूट होते आहे. त्यामुळे सायबर डाका हा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्यातील फास आवळला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दीड हजारांपेक्षा अधिक तक्रार अर्ज सायबर पोलिस ठाण्याकडे येत आहेत. सायबर पोलिसांनी गेल्या तीन वर्षांत तब्बल एक कोटी ६६ लाख ३८ हजार १९२ रुपयांची रिकव्हरी केली आहे. हे प्रमाण लक्षणीय आहे.

मोबाईलवर संपर्क साधून तुमच्या क्रेडिटकार्डची मर्यादा वाढवून दिली जाणार आहे, असे भासवून क्रेडिटकार्ड नंबर आणि पासवर्ड, ओटीपी विचारून पैसे हडपले जात होते. विविध नामांकित फायनान्सचे नाव सांगून कर्ज कमी व्याजाने देण्याचे आमिष दाखविले जाते. कर्ज प्रकरणाच्या प्रक्रियेसाठी सुरूवातीस कमी रक्कम आकारली जाते. त्यानंतर मुद्रांक शुल्क, विमा आणि कर्जाच्या पहिल्या हप्त्यापोटी रक्कम घेतली जाते. या प्रकारात २० ते २५ हजार रुपयांना फसविले जाते. त्यानंतर संबंधित मोबाईल बंद केला जातो. बॅंकेच्या ज्या खात्यात पैसे भरलेले असतात, ते काढून सायबर गुन्हेगार फरार होतात.

सोशल मीडियातील अकाउंट क्लोन करुन सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक तसेच फेसबुकशी संबंधित असलेल्या सर्वांना वैद्यकीय कारणास्तव पैशाची गरज असल्याचा मेसेज पाठविला जातो. या स्वरुपाच्या तक्रारी जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. २०२० मध्ये सुमारे एक हजार ३२४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०२१ मध्ये एक हजार ५७२ तक्रारी आल्या. २०२२ मध्ये जानेवारीअखेर ५९ तक्रारी आहेत.

दीड कोटीची रक्कम वसूल

एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, कर्ज, शोरूमच्या आमिषाने फसवणूक प्रक्रियेत सायबर गुन्हेगारांकडून संबंधित खाते बंद होण्याच्या आत तक्रार सायबर पोलिसांकडे केल्यास गुन्हेगारांवर कारवाई करणे शक्‍य होते.पोलिसांनी २०१९ मध्ये एक कोटी ४१ लाख ३६ हजार ९५९ रुपये वसूल केले. २०२०मध्ये ५१ लाख २७ हजार ५७५ रुपये तर २०२१ मध्ये ७२ लाख ९८ हजार ६२३ रुपये मिळवून देण्यात सायबरला यश आले.

हे आहेत सायबर योद्धे

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले आणि उपनिरीक्षक प्रतीक कोळी या दोन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गुंडू, अभिजित आरकल, अरूण सांगळे, भगवान कोंडा, गणेश पाटील, योगेश गोसावी, मलिकाअर्जुन बनकर, दिगबंर कारखिले, उमेश खेडकर, राहुल हुसळे, सम्राट गायकवाड, उमेश खेडकर, सविता खताळ, पूजा भांगरे, उर्मिला चेके आदी १८ कर्मचारी सायबर गुन्हेगारांच्या विरोधात कार्यरत आहेत.

अनोळखीशी व्यवहार नको

जादा पैशांचा परतावा, शोरूम देणे, मोबाईल टॉवर देणे असे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्‍तीबरोबर व्यवहार करू नका. कर्ज देणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कोणाला ही आपल्या एटीएमचा नंबर, पासवर्ड, ओटीपी देऊन नका. काही ॲप, लिंक डाऊनलोड केल्यास सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना प्राप्त होते. ॲप, लिंक डाऊनलोड करू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.