आकाशातील सौदामिनीवर ‘दामिनी’ची नजर

वीज अलर्टचे अॅप सुरक्षा उपाय योजायला मिळणार अवधी
Damini App
Damini AppSakal
Updated on

सिंधुदुर्गनगरी : आकाशात कडाडणाऱ्या सौदामिनीवर (वीज) दामिनीची नजर राहणार आहे. या अॅपमुळे आता वीज कोसळण्याआधीच अलर्ट मिळणार आहे. मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी किंवा परतीचा पाऊस सुरू होण्याच्या कालावधीत अनेकदा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो. या पार्श्वभूमीवर हे ॲप फायद्याचे ठरणार आहे.

काही वेळा वादळेही होतात. यात अनेकदा वित्तहानी व जीवितहानीही होते. ही हानी टाळण्याच्या उद्देशाने उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे (IITM) व पृथ्वी प्रणाली विज्ञान संस्था (ESSO) यांच्या संयुक्तविद्यमाने दामिनी हे विजांच्या लखलखाटांचा इशारा देणारे मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे शेतकऱ्यांना विजांच्या कडकडाटांचा व वादळी पावसाचा अंदाज साधारणतः १५ ते ४५ मिनिटे अगोदर मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृिष्टकोनातून उपाययोजनाही करणे शक्य होणार आहे.

ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे (ता. कुडाळ) येथील डॉ. यशवंत मुठाळ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. विजेचे झटके व कडकडाट ही एक अशी घटना आहे की जनमानव जातीला केवळ हानी पोहोचवत नाही तर भयभीतही केले आहे. प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर सुमारे ५० ते १०० विजेचे झटके येतात. अलीकडच्या काळात पृथ्वीवर इतर नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत वीज सर्वाधिक मारक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. एकट्या विजेमुळे भारतात दरवर्षी सुमारे दोन हजार ते अडीच हजार मृत्यू होतात. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे.

पाऊस म्हणजे नवनिर्मिती. पाऊस म्हणजे हिरवाई अन् मनमुराद आनंद; परंतु पावसाआधी आकाशात सौदामिनीचा कडकडाट आलाच. तिच्या कडकडाटामुळे आपसुक नुकसान हे आलेच. वीज कोसळून होणारी हानी टाळता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी काय करावे? काय करू नये? यासंदर्भात माहिती देण्यासाठी ‘दामिनी’ हे अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. ‘दामिनी’साठी ‘आयआयटीएम’ने लाईटनिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसवले आहेत. प्रत्येक सेन्सरची २०० किलोमीटर परिघातील घडामोडींचा वेध घेण्याची क्षमता असून परिसरातील क्षेत्रात आगाऊ इशारा मिळतो. सर्व सेन्सर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी जोडल्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आणि घडामोडी नगरिकांना घरबसल्या समजणार आहेत.

असे मिळेल अॅप

नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini हे अॅप मोबाईलवर डाउनलोड करावे. त्याचबरोबर नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड आदीची माहिती अॅपमध्ये नोंदवावी.

वापराचे आवाहन

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागानेही याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज कोसळून होणाऱ्या हानीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने आएमडी व आयआयटीएम यांनी विकसित केलेल्या ‘दामिनी’ अॅपबाबत जागृती निर्माण करून त्याचा व्यापक प्रमाणावर प्रचार व वापर करण्याबाबत विशेष सूचना केली आहे. या अॅपचा नागरिकांनी जरूर वापर करावा आणि संभाव्य होणाऱ्या हानीपासून बचाव करावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()