आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न अधुरेच; मायलेकींचा अंत

mother-daughter death
mother-daughter deathesakal
Updated on

राशीन (जि.अहमदनगर) : सायंकाळी उशिरा कानगुडवाडी शिवारातील संदीप कानगुडे यांच्या शेतातील विहिरीजवळ स्कार्फ स्कार्प व पांढऱ्या रंगाची दोरी दिसली. त्यामुळे विहिरीत डोकावून पाहिले असता, ग्रामस्थांना धक्का बसला....प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या उमाला कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे होते. काय घडले नेमके? (death-drowning-well-daughter-mother-in-Kangudwadi-marathi-news-jpd93)

कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे उमाचे स्वप्न अधुरेच

राशीन येथील आशा राजू उकिरडे (वय४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) या मायलेकी स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. मात्र सायंकाळ झाली तरी त्या घरी न आल्याने पती राजू उकिरडे व शेजाऱ्यांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. सायंकाळी उशिरा कानगुडवाडी शिवारातील संदीप कानगुडे यांच्या शेतातील विहिरीजवळ स्कार्फ स्कार्प व पांढऱ्या रंगाची दोरी दिसली. त्यामुळे विहिरीत डोकावून पाहिले असता, आशा उकिरडे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. शनिवारी मध्यरात्री आशा यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र उमाचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. आज (रविवार) सकाळी उमाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केला. विहिरीजवळील कडुनिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढत असताना मुलीचा पाय घसरून ती विहिरीत पडली असावी व मुलीस वाचविण्यासाठी गेलेली आईही विहिरीत बुडाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर आज राशीन येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू पांडुरंग उकिरडे यांच्या खबरीवरून राशीन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उमा नाही मी तुमचा उमेश

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या उमाला कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे होते. मात्र काळाने झडप घटल्याने तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले. राजू उकिरडे यांना तीनही मुलीच असल्याने उमा त्यांना म्हणायची पप्पा मी तुमचा मुलगाच आहे असे समजा. मी उमा नाही तुमचा उमेश आहे. स्वयंपाकासाठी शेतात सरपण आणण्यास गेलेल्या मायलेकींचा कानगुडवाडी शिवारात विहिरीत बुडून अंत झाला. ही घटना शनिवारी (ता. १७) कानगुडवाडी (ता. कर्जत) येथे घडली. आशा राजू उकिरडे (वय४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

mother-daughter death
श्रीगोंद्यात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी! विखे गटाची साथ
mother-daughter death
नगरचा जवान गुवाहाटीतून बेपत्ता; घातपाताचा पत्नीचा संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()