शनिशिंगणापूरला दर्शनाला जात असाल तर ही महत्वाची बातमी

शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय
shani shingnapur
shani shingnapuresakal
Updated on

सोनई (जि.अहमदनगर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव (Second Wave of Corona) कमी झाल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) अनेक निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठा आणि मॉल्स (Market and Malls) सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर आता आजपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यभरातील धार्मिक स्थळं उघडण्यास देखील परवानगी (Mandir Ughadnar) देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (state government) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरतीनंतर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर सुरु झाले आहे. मात्र या दर्शनासाठी तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

शनिशिंगणापूरला दर्शनाला जात असाल तर ही महत्वाची बातमी

जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी शिर्डीत बैठक घेतली. त्यात देवस्थानच्या विश्वस्तांशी बोलून निर्णय घेतला आहे, शिर्डीत फक्त ऑनलाईन पासनुसार दर्शन असले तरी शनिशिंगणापुरात ऑफलाईन दर्शन असणार आहे. नवरात्रीच्या (Navratri 2021) पहिल्या दिवसापासून मंदिरं खुली होणार आहेत. मंदिरात येताना भक्तांनी आरोग्याचे नियम पाळावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही त्यात संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहेत. शनि मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश बंद ठेवून सर्वांना खालूनच दर्शन ठेवले आहे. चप्पल महाद्वारापर्यंत आणण्यास परवानगी नाही. याशिवाय मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे.

shani shingnapur
अजित पवारांच्या अडचणीत वाढ?निकटवर्तीयांकडे income tax छापेमारी

शिंगणापुरात चौथऱ्यावरील शनिदर्शनाला बंदी

घटस्थापनेच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरतीनंतर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर सुरु होत आहे. येथील स्वयंभू शनिमूर्तीला स्पर्श नको असल्याने सर्व भाविकांना चौथऱ्या खालूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. यासह अन्य नियमांच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी विश्वस्त मंडळास दिल्या. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले उपस्थित होते

shani shingnapur
केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.