अहमदनगर शहरात फटाकेबंदी? महापालिका सभेत होणार निर्णय

decision to ban firecrackers in Ahmednagar city on Diwali will be taken at  municipal meeting
decision to ban firecrackers in Ahmednagar city on Diwali will be taken at municipal meetingGoogle
Updated on

अहमदनगर : दीपावलीनिमित्त होणाऱ्या आतषबाजीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी महापालिकेला सूचना पाठवून प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेबंदी करण्याबाबत प्रस्ताव महासभेसमोर ठेवावा, असे म्हटले आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेच्या सभेत अंतिम निर्णय होणार आहे.

दर वर्षी दीपावलीला फटाक्यांची आतषबाजी होते. मागील वर्षी कोरोनामुळे अनेक बंधने आली. या वर्षी काहीअंशी नियम शिथिल असले, तरी शासनाच्या वसुंधरा अभियानांतर्गत प्रदूषण टाळणे महत्त्वाचे आहे. त्याच कारणाने नाशिक विभागीय आयुक्तांनी फटाकेबंदीबाबत महापालिका आयुक्तांना सूचनापत्र दिले आहे. याबाबत महापालिकेच्या सभेत ठराव मांडावा, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या महासभेत याबाबत चर्चा होणार आहे. फटाकेबंदी करायची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी महासभेवर अवलंबून राहणार आहे.

फटाकेविक्रेत्यांना धास्ती

फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यतेच्या चर्चेने फटाके व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. फटाक्यांचे बुकिंग सहा महिने आधी करावे लागते. बहुतेक व्यापाऱ्यांनी नोंदणी करून कंपन्यांकडून फटाके उपलब्ध करून घेतले आहेत. शहरात बंदी आणल्यास त्याचा मोठा परिणाम या व्यावसायिकांवर होणार आहे.

decision to ban firecrackers in Ahmednagar city on Diwali will be taken at  municipal meeting
नेवाशात दोन गटांत तुंबळ मारामारी; पंधरा आरोपींना अटक


फटाकेबंदीबाबत नाशिक विभागीय आयुक्तांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पदाधिकारी याबाबत योग्य तो ठराव करतील. त्यानंतर फटाकेबंदी होईल की नाही हे स्पष्ट होणार आहे.
- शंकर गोरे, आयुक्त

decision to ban firecrackers in Ahmednagar city on Diwali will be taken at  municipal meeting
'मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो!' दोन पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.