hasan mushrif
hasan mushrifesakal

पाथर्डी-शेवगावात दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार

Published on

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पाथर्डी-शेवगाव हा दुष्काळी भाग असून, येथील शेतकरी (farmer) संकटात आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घेऊ. मुळा धरणाचे आवर्तन सोडणे आणि भगवानगड व पस्तीस गावांच्या पाणीयोजनेच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो. आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, ॲड. प्रताप ढाकणे यांनी सुचविलेली विकासकामे करू. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता विकासासाठी काम करण्याचा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाथर्डी-शेवगावकरांना दिला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ : पाथर्डी येथे कोरोना आढावा बैठक

येथील संस्कार भवनात शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती डॉ. क्षितिज घुले, शिवशंकर राजळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संजय बडे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, की कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. शेवगाव-पाथर्डीत ४६४ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. येणारी लाट रोखण्यासाठी कोरोनाचे नियम पाळावेत. लसीकरणासाठी चांगले काम करू. दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू. भगवानगड पाणीयोजनेसाठी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न सोडवू. ॲड. प्रताप ढाकणे व राजश्री घुले यांनी, मुळाचे आवर्तन सोडावे, भगवानगड व पाथर्डी-शेवगावच्या पाणीयोजनेसाठी निधी द्यावा, अशा मागण्या केल्या.

hasan mushrif
श्रीगोंदे : 'त्या' भोंदुबाबांचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

पाणीयोजना पुन्हा नव्याने मंजूर

भगवानगड पाणीयोजनेला निधी द्यावा, मुळा चारीचे आवर्तन सोडावे, पाथर्डी- शेवगाव पाणीयोजना पुन्हा नव्याने मंजूर करावी, दुष्काळी स्थितीबाबत निर्णय घ्यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार श्याम वाडकर यांनी आभार मानले.

hasan mushrif
बंदी असूनही बैलगाडा शर्यतीचा थरार; 47 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()