पाथर्डी : पक्षाचे काम आम्ही करायचे अन सत्ता मात्र तुम्ही उपभोगायची हे येथून पुढील काळात चालणार नाही. पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी अन्यथा वेळ पडल्यास जनतेच्या आशिर्वादावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असा इशारा जिल्हा भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दौण्ड यांनी दिला.
दौण्ड व भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या अधिपत्याखाली आज विजय लॉन्स येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यापूर्वी शक्तिप्रदर्शन करत दोन्हीही नेते मेळाव्याच्या ठिकाणी आले.
यावेळी शेवगाव भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, अरुण मुंडे, बाळासाहेब सोनवने, सुनीता दौण्ड, उदय मुंडे, उद्योजक भीमराव फुंदे, दीपक जाधव, शिवसंग्राम इसरवाडे, भूषण देशमुख, सतीश मासाळकर, बाळासाहेब खोरदे, बाळासाहेब कोळगे, गुरुनाथ माळवदे, सतीश मगर हे उपस्थित होते. मेळाव्याकडे राजळे समर्थकांनी पाठ फिरवली तर दौण्ड व मुंडे यांनी राजळे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांच्यावर टीका केली.
दौण्ड म्हणाले, कि तिन्हीही घराण्याकडे अनेक वर्षांपासून सत्ता आहे मात्र आजही पाणी, बेरोजगारी हे प्रश्न सुटलेले नाहीत. सरपंच पदापासून आमदार पदापर्यंतचे सर्व पदे यांना यांच्याच घरात ठेवायची असून आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आता सर्वसामान्यांच्या हातात सत्ता येणे गरजेचे आहे.
कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. सासरे, पती आमदार होते व तुम्ही सुद्धा दहा वर्षांपासून आमदार असताना मतदारसंघातील प्रश्न जैसे थे आहेत. आम्ही जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असून यावेळी भाजपने मुंडे किंवा मला उमेदवारी द्यावी.आभार गुरुनाथ माळवदे यांनी मानले.
प्रनिष्ठावंतांना न्याय देण्याची वेळ आता आली आहे. ज्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही त्यांना आम्ही डोक्यावर घेतले. आम्ही उमेदवारी मागतो तर काहींच्या पोटात गोळा यायला लागला आहे. सर्व पदे तुमच्याच घरात ही लोकशाही नाही. दहा वर्षात मोठा विकास केला म्हणता मात्र हा विकास तुमच्या खिशातून केला नसून शासनाच्या निधीतून केला आहे. दहा वर्ष हे कुणाला भेटले नाही मात्र निवडणूक तोंडावर आल्याने दोन महिन्यात आता हे फिरायला लागले आहे. सतरा पक्ष फिरून आले अन आता हे डोक्यावर बसले असून हिम्मत असेल तर त्यांनी सर्वसामान्यांना उमेदवारी द्यावी.
- अरुण मुंडे,प्रदेश सरचिटणीस, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.