Ahmednagar News : अहमदनगरचा सूर सातासमुद्रापार

सागवानी लाकडापासून तयार केलेल्या हार्मोनियमला परदेशात मागणी
demand for harmonium made from teak wood abroad ahmednagar marathi news
demand for harmonium made from teak wood abroad ahmednagar marathi newsSakal
Updated on

अहमदनगर : जिल्ह्याने विविध क्षेत्रांत जागतिक पातळीवर नाव कमावले. संगीत क्षेत्रातही तसुभर कमी नाही. येथे तयार होत असलेल्या सागवानी लाकडापासून बनविलेल्या हार्मोनियमला अमेरिकेत मागणी वाढत आहे. काही उत्पादकांनी वीस वर्षांपूर्वीच या वाद्याची निर्यात केली होती.

हार्मोनियम बनविताना अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागतो. सर्वसामान्यपणे बाजारात उपलब्ध होत असलेल्या हार्मोनियम पुठ्ठ्यापासून बनवितात. दिसायला आकर्षक असल्या, तरी टिकावूपणा कमी असतो.

सागवान लाकडापासून बनविलेल्या हार्मोनियमचा आवाज चांगला असतो. त्यासाठी वापरलेले सागवान जुने खांडातील घेतले जाते, तसेच त्या सुमारे ३० वर्षांपर्यंत टिकून राहतात. ४४ पट्टीच्या, पावणेचार सप्तक, सव्वातीन सप्तक, तसेच साडेतीन सप्तकाच्या हार्मोनियम असतात. अशा आठ ते दहा प्रकारच्या हार्मोनियम येथे तयार होतात.

पॅरीस सूर, जर्मन सूर या प्रकारचे सूर तयार केले जातात. त्याची किंमत नऊ हजारांपासून एक लाखांपर्यंत असते. जामखेड, पुणे येथील बहुतेक तमाशा कलावंत नगरमधूनच पायपेटी घेतात. जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील बहुतेक गावांत नगरच्या हार्मोनियम आहेत. भजनी मंडळांकडून नगरमध्ये तयार झालेल्या या वाद्याला पसंती दिली जाते.

भारत वाद्यांचे मोठे उत्पादन

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हार्मोनियम बनविण्याचे प्रयोग झाले. इंग्लंडमधील जॉन ग्रीन कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर १८३३ मध्ये हे वाद्य बनविले. त्यानंतर फ्रान्समध्ये प्रयोग झाले. आलेक्सांद्र डेबिन याने १८४० मध्ये या वाद्याला मूर्त स्वरूप आले. १८४३ मध्ये या वाद्याचा अधिक विकास होऊन त्याचा प्रचार होऊ लागला. भारतात या वाद्याला विशेष पसंती आहे. १९१५ पर्यंत भारत हा वाद्याचा जगात सर्वात मोठा उत्पादक देश होता.

हार्मोनियममधून चांगला सूर निघणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यासाठी आवश्यक साहित्य चांगल्या दर्जाचे हवे असते. नगरचे उत्पादक यामध्ये तडजोड करीत नाहीत. त्यामुळेच परदेशात मागणी वाढू लागली आहे.

- विकी जाधव, हार्मोनियम उत्पादक.

हार्मोनियम बनविण्याची आमची तिसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. चांगला सूर निघण्यासाठी भाता, लाकूड या गोष्टी परिणाम करतात. त्याचा अभ्यास असल्याने येथील वाद्य महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशात पाठविले जात आहेत.

- सचिन धुळेकर, हार्मोनियम उत्पादक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()