अपहारप्रकरणी उपसरपंचास अटक; पाच महिने होता पसार

deputy sarpanch arrested
deputy sarpanch arrestedesakal
Updated on

बोटा (जि.अहमदनगर) : सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामसेवकाच्या मदतीने १६ लाख १३ हजार ७२० रुपयांचा अपहार करणारा सारोळे पठारचा (ता. संगमनेर) उपसरपंच प्रशांत फटांगरे याला रविवारी (ता. ११) रात्री घारगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरा आरोपी ग्रामसेवक सुनील शेळके पसार आहे. (deputy-sarpanch-arrested-ahmednagar-crime-marathi-news)

पाच महिने होता पसार

गावातील एका व्यक्तीने २५ जानेवारी २०२० रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे, ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करून १० फेब्रुवारी २०२० रोजी चौकशीचे आदेश दिले होते. समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करून सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत सरपंचपदावरील फटांगरे व ग्रामसेवक शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार व अपहार केल्याचा अहवाल ३१ जुलै २०२० रोजी गटविकास अधिकाऱ्यांना सोपविला होता.

पाच दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, दोघांना नोटिसा बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. फटांगरे याने नोटिशीकडे दुर्लक्ष केले. ग्रामसेवक शेळके याने एक ऑक्टोबर रोजी म्हणणे सादर केले. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विद्यमान उपसरपंच फटांगरे व ग्रामसेवक शेळके या दोघांच्या विरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोघे पसार होते. पाच महिन्यांनंतर फटांगरे रविवारी रात्री दहा वाजता आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात आला असता पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.