Ahmednagar : आनंदाचा शिधा पोचलाच नाही

सात गावांतील लाभार्थी वंचित; ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त
Ration card holders deprived
Ration card holders deprivedsakal
Updated on

पारनेर : दिवाळी संपली तरीही तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानात सरकारतर्फे शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा पोचलाच नाही. १३९ पैकी सात गावात अद्यापही या लाभार्थ्यांना हा शिधा न मिळाल्याने या लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिवाळी निमित्त सरकारमार्फत अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधा पत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत चणाडाळ, तेल, रवा व साखर प्रत्येकी एक किलो फक्त १०० रुपयात देण्यात येणार होती. परंतु, तालुक्यातील काही दुकानात अद्यापही हा आनंदाचा शिधा पोचलाच नाही. स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत अंत्योदय व प्राधान्यक्रम सिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये या चार वस्तूंचे वाटप दीपावलीनिमित्त केले होते. तालुक्यात १३९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यात ५४ हजार ७८५ लाभार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दिपवाळी पूर्वीच साठ स्वस्त धान्य दुकानात या चारही वस्तू वाटप केल्या होत्या.

मात्र, काही ठिकाणी रवा न आल्याने त्यानंतर ४५ स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ, तेल व साखर या तीनच वस्तूंचे वाटप केले होते. दिपवाळीनंतर रवा आल्यावर त्याही दुकानात रवाचं वाटप केलं आहे.दरम्यान, सध्या आठ हजार पाचशे ऐंशी किलो तेल व चार हजार आठशे दहा किलो रवा येणे बाकी आहे. तसेच सात स्वस्त धान्य दुकानात अद्यापही आनंदाचा शिधा पोचला नाही. दिपावाली होऊन चार दिवस उलटले तरीही आनंदाचा शिधा न पोचल्याने या परिसरातील लाभार्थींमध्ये नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.