Ahmednagar Crime : काम जमत नसेल, तर घरी बसा; डॉ. किरण लहामटे यांचा इशारा

तीन दिवसांत आरोपीला अटक केले नाही, तर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून तुम्हाला अगोदर घरी पाठवू
dr kiran lahamate warn police arrest criminal otherwise leave your post ahmednagar crime police
dr kiran lahamate warn police arrest criminal otherwise leave your post ahmednagar crime policeSakal
Updated on

राजूर : तुम्हाला सरकार पगार देते, ते गुन्हेगारांना पकडून सरळ करण्यासाठी. मात्र हे काम राजूर पोलिसांना जमत नसेल, तर परत जा. तीन दिवसांत आरोपीला अटक केले नाही, तर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून तुम्हाला अगोदर घरी पाठवू, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपीस २५ दिवस उलटूनही पोलिसांना सापडत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी राजूर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. या मोर्चासमोर ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनीता भांगरे, दिलीप भांगरे, मारुती मेंगाळ, सतीश भांगरे, सखाराम गंगाड, मदन पथवे, सीताबाई पथवे, देविदास खडके, रावजी मधे, अर्जुन खोडके, भरत तळपाडे, अजय भांगरे, स्वप्नील धांडे, सुरेश पथवे, आनंद गिऱ्हे, संतोष मुतडक, लकी जाधव, पांडू पारधी उपस्थित होते.

सुनीता भांगरे यांनी महिला, मुलींना संरक्षण मिळत नसेल, तर पोलिस ठाणे काय कामाचे. आरोपी राजरोस हिंडत असेल, तर वरिष्ठांनी या गुन्ह्याचा तपास वर्ग करावा. यावेळी महिलांनी बांगड्यांची भेट दिली. पुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांना निवेदन देण्यात आले.

घटना दुर्दैवी असून, पीडितेचे नातेवाईक आपणाला येऊन भेटले. याबाबत आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरोपीला अटक करण्यास भाग पाडू.

- वैभव पिचड, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.