नेवाशात मुद्रांकांची कृत्रिम टंचाई! नागरिकांची होतेय गैरसोय

due to artificial shortage of stamps there are queues of customers in tehsil office in nevasa
due to artificial shortage of stamps there are queues of customers in tehsil office in nevasaSakal
Updated on


नेवासे (जि. अहमदनगर) : तहसील कार्यालयात मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची अडवणूक होत आहे. कोविड काळातही मुद्रांक खरेदीसाठी मोठी झुंबड पाहायला मिळते. चार पैकी एकाच मुद्रांक विक्रेत्यावर सध्या मुद्रांक विक्रीचा डोलारा उभा असून, ग्राहकांना चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.


नेवासे तहसील कार्यालयात चार परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहे. त्यातील दोन विक्रेते गेल्या वर्ष-दीड वर्षापासून कोषागार कार्यालयाकडेचे फिरकलेच नाहीत. इतर दोघांपैकी एक आठवडा-महिन्याभरातातून एकदा-दोन मुद्रांक विक्री करतो. नेवासे तहसील कार्यालयात दररोज नेवासे व शेवगाव तालुक्यांतील शेकडो नागरिक मुद्रांक खरेदीसाठी नेवासे येथे येतात. केवळ एकाच मुद्रांक विक्रेता असल्याने मोठी गर्दी होते.

मुद्रांक विक्रेत्यांवर दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक जिल्हाधिकारी विभागाचे नियंत्रणच राहिले नसल्यानेच मुद्रांकांच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुद्रांकांबरोबरच वीस, दहा व पाच रुपयांची तिकिटेही मिळत नसल्याने नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

due to artificial shortage of stamps there are queues of customers in tehsil office in nevasa
नगर- पुणे महामार्गावर विचित्र अपघात; चार जण जागीच ठार


मुद्रांक खरेदीच्या रांगेत 'शेवगावकर'

शेवगाव येथेही मुद्रांक मिळत नसल्याने तालुक्यातील पन्नास टक्के ग्राहक नेवाशाकडे मोर्चा वळवतात. तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाच्या रांगेत शेवगाव तालुक्यातील नागरिकही पाहायला मिळतात.

मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांची अडवणूक होणार नाही, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येतील.
-रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे

मुद्रांक खरेदीसाठी मागील दोन-तीन दिवसांपासून मी नेवशाला येतो. मात्र सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत खरेदीसाठी मोठी रांग असते. संबंधित विभागाने मुद्रांकांची टंचाई दूर करावी.
- राजेंद्र नागरे, जैनपूर, ता. नेवासे

due to artificial shortage of stamps there are queues of customers in tehsil office in nevasa
सख्या भावंडांसह तीन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()