Karjat : मृत्यूनंतरही नशिबी यातनाच! शवविच्छेदन कर्मचाऱ्यांअभावी कर्जतला मृतदेह ताटकळत

Karjat
Karjat
Updated on

राशीन : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारा कर्मचारीच नसल्याने येथे मृतदेहांची अवहेलना तर नित्याचीच झाली असून शवविच्छेदनासाठी मृतांच्या नातेवाईकांना तास न तास ताटकळत बसावे लागत आहे. रक्ताच्या नात्यातील माणसांच्या नशिबी मरणानंतरही शासनाच्या उदासीन धोरणामुळे होणाऱ्या वेदना कर्जत तालुक्यातील जनतेच्या जिव्हारी लागत आहेत.

Karjat
Crime news : पतीनेच केले स्वतःच्या पत्नीचे अपहरण! मित्रांसमवेत बलात्कार करून अशी केली हत्या...

अपघात, हृदय विकाराचे धक्के, आत्महत्या, खून आदी प्रकरणातील मृतदेहांची उत्तरीय तपासणी महत्वाची असल्याने तालुक्यात एकमेव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते. मात्र त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून त्यातील तज्ञ व्यक्ती येईपर्यंत नातेवाईकांना ताटकळत बसावे लागते. यामध्ये कधी दिवस-रात्र, तर कधी सायंकाळ पर्यत थांबाबे लागत आहे. विशेष म्हणजे मृतांच्या नातेवाईकांना त्यासाठी तीन हजार रुपये रोख मोजावे लागतात.

नुकतेच बारडगाव येथे सचिनसिंग बबनसिंग परदेशी (वय-36) यांचे हृदय विकाराचे धक्क्याने निधन झाले. रात्री एक वाजता त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत उत्तरीय तपासणी झाली नाही. शवविच्छेदन करणारा कर्मचारी नाही.

Karjat
Maharashtra Politics: महाविकास आघाडीसमोर पेच! महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या हालचालींना वेग

सदर व्यक्ती हि करमाळ्याहून बोलवावी लागेल. त्यासाठी त्याच्या खात्यावर ऑनलाईन तीन हजार रुपये पाठवावे लागतील असे संबंधित डॉक्टरांनी सांगितल्यावर मृत परदेशी यांच्या नातेवाईकांनी संबधितांच्या खात्यावर रक्कम पाठवूनही तो कर्मचारी वेळेत न आल्याने मृताच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला.

या घटनेची दखल घेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुका समन्वयक पप्पू धोदाड, सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष गणेश पालवे, हनुमंत गावडे, संभाजी गोसावी यांनी डॉक्टर यांना याबाबत जाब विचारीत चांगलेच धारेवर धरले. व तात्काळ उत्तरीय तपासणी करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

आरोग्य विभागाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर शवविच्छेदन कमर्चारी नेमावा. मृतांच्या नातेवाईकांकडे त्यासाठी पैशांची मागणी करू नये.

- सचिन पोटरे (भाजप जिल्हा सरचिटणीस)

परदेशी यांच्या बाबतीत पोलिसांनी पंचनामा उशिरा केल्यामुळे विलंब झाला. एरवी असा विलंब होत नाही. वरिष्ठ स्तरावर येथे शवविच्छेदन कमर्चारी मिळण्यासाठी मागणी केली आहे.

- डॉ. रविंद्र पापडे (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.