न्यायालयात ई फायलिंग सुविधा सुरु होणार - न्या. यार्लगड्डा

Court
Courtesakal
Updated on

अहमदनगर : कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) येण्याची शक्‍यता असल्याने एक जानेवारी पासून न्यायालयात ई-फायलिंग (E-filing) सुरु करण्याचा आदेश आला आहे. न्यायालयात लवकरच ई फायलिंग सुविधा सुरु होणार आहे, अशी माहिती प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली.

जिल्हा न्यायालयामधील वकिलांच्या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते केले. या प्रसंगी अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष अॅड. संदीप वांढेकर, सचिव अॅड. स्वाती नगरकर, खजिनदार अॅड. अविनाश बुधवंत आदींसह पदाधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अॅड. सरोदे म्हणाले, नव्या वर्षाची सुरूवात चांगली व्हावी, यासाठी पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले आहे. दिवसाचे नियोजन ठरविताना कामकाज सुटसुटीत होण्यासाठी उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या सर्व सुट्या व स्थानिक सुट्या या दिनदर्शिकेत अधोरेखित केल्या आहेत. जिल्हा न्यायालयात नव्याने सुरु झालेल्या पे अँड पार्क साठी संघटनेच्या वतीने सर्व वकील सदस्यांना अल्पदरात वार्षिक पास देण्यात येणार आहे.

Court
WHO प्रमुख म्हणतात; '२०२२मध्येच कोरोनाचा खात्मा होईल, मात्र एका अटीवर…'

जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश आर. डी. चव्हाण, मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. ए. तिवारी या न्याधीशांना पदोन्नती मिळाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. अॅड. शाम असावा यांची शासनाच्या लोक आयुक्त समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

उपाध्यक्ष अॅड. संदिप वांढेकर यांनी प्रास्ताविक केले. सदस्य अॅड. सागर जाधव, विक्रम शिंदे, अॅड. सोनाली कचरे आणि कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सचिव अॅड. स्वाती नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार अॅड. अविनाश बुधवंत यांनी अभार मानले.

Court
अकोला जिल्ह्यात मालमत्ता गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.