Ahmednagar News : ‘ई-ऑफिस प्रणाली’ वापरात अहमदनगर जिल्हा ‘नंबर वन’

अहमदनगरमध्ये १५ हजार ९१४ ई-फायली; कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण घटले
e office system 15 thousand 914 file digitize in ahmednagar
e office system 15 thousand 914 file digitize in ahmednagarSakal
Updated on

Ahmednagar News : शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींची कामे जलदगतीने होण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘ई-ऑफिस प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘ई-ऑफिस प्रणाली’द्वारे कामांचा निपटारा करण्यात अहमदनगर जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीमध्ये २४ हजार ८३१फाईल तयार झाल्या आहेत. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, पाटबंधारे, वन,

सामाजिक वनीकरण, जिल्हा शासकीय रुग्णालय, भूमिअभिलेख, जिल्हा कोषागार अशा राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर केले जातात. योजनांच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी आदी कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने सतत पत्रव्यवहार सुरू असतो.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या आवक-जावक विभागात ही कागदपत्रे स्वीकारली जातात. बऱ्याचदा अडचणीच्या फायलींमधील महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश न करणे, गहाळ करणे असे गैरप्रकार केले जातात. अनेकदा या फायली गयाब करून कारवाई टाळली जात होती.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व कागदपत्रे स्कॅन करून पाठविण्याची प्रणाली अर्थात ‘ई-ऑफिस प्रणाली’ नावाची नवीन प्रणाली विकसित केली. राज्यातील अनेक शासकीय कार्यालय ही प्रणाली वापरण्याकडे दुर्लक्ष करत होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी काही दिवसांपूर्वी इतर शासकीय कार्यालयांतील टपाल जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार नसून, त्यांना ‘ई-प्रणाली’चा वापर करावा लागणार असल्याचे आदेशित केले होते. त्यानुसार या मोहिमेने गती घेतली.

जिल्ह्यात ‘ई-आफिस प्रणाली’ कार्यान्वित करून त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सात प्रांताधिकारी कार्यालये तसेच १४ तहसील कार्यालयांतील उपलब्ध संगणकीय साहित्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

ही प्रणाली वेगवान पद्धतीने राबविण्यासाठी सर्व कार्यालयांस साधनसामग्री खरेदीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्या राज्यात ‘ई-ऑफिस प्रणाली’मध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

e office system 15 thousand 914 file digitize in ahmednagar
Ahmednagar News : शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पुन्हा संपाचे हत्यार; २५ संघटनांचा आंदोलनात सहभाग

जिल्ह्यानिहाय आकडेवारी

औरंगाबाद-४ हजार ५५८, रत्नागिरी-२१ हजार १४२, अहमदनगर-२४ हजार ८३१, परभणी-१ हजार ६३९, नांदेड-१२ हजार ४९२, रायगड-५ हजार ९४५, वर्धा-१५ हजार ९१४, ठाणे-७ हजार ५५४, पालघर-८ हजार २२४, गडचिरोली-३ हजार ८५७,

नागपूर-८ हजार ६११, नंदुरबार-१२५, चंद्रपूर-५ हजार २०२, मुंबई-१ हजार ७७८, यवतमाळ-६ हजार २७९, जालना - ७ हजार४७६, वाशिम-३ हजार ८६६, मुंबई शहर -५८८, बांद्रा-५ हजार९०८, सिंधुदुर्ग-३ हजार २८९, नाशिक-२ हजार ६३,

e office system 15 thousand 914 file digitize in ahmednagar
Ahmednagar News : जामखेडमध्ये कडकडीत बंद; रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवरील पोलिसांच्या हल्ल्याच्या निषेध

सातारा-४ हजार ४७१, उस्मानाबाद-४ हजार ८८, लातूर-६७७, जळगाव-३१८, बीड-७१८, गोंदिया-१ हजार १११, सांगली-१ हजार ६५१, कोल्हापूर-९३९, अमरावती-१ हजार ५६६, पुणे-१ हजार ६२३, धुळे-२१९, सोलापूर-४७१, अकोला-२६७, बुलढाणा-१९८, हिंगोली-२१३ असे एकूण १ लाख ६९ हजार ८८६ ई फाईल तयार करण्यात आल्या आहेत.

‘ई-ऑफिस प्रणाली’मुळे ७० टक्क्के टपाल बंद झाले आहेत. त्यामुळे अधिकरी-कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला आहे. तसेच प्रशासन गतिमान झाले आहे. त्यामुळे इतर विभागांना ही आदेश काढून ई-आॅफिस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.